सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपट प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. चित्रपटाची कथा धर्मांतर केलेल्या चार महिलांची आहे, ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.
एकीकडे काही लोक या चित्रपटाला प्रचंड विरोध करीत आहेत, तर दुसरीकडे या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. एकही स्टार नसूनही या चित्रपटाने १५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी ३२००० मुली या आकड्यावरून प्रचंड गहजब झाला होता. मध्यंतरी या चित्रपटातील कलाकारांचा एक अपघातही झाला होता. आता या चित्रपटात ‘आसिफा’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीला धमक्या मिळत असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा भेटताना दारूच्या नशेत होते मनोज बाजपेयी; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ धमाल किस्सा
‘आज तक’च्या वृत्तानुसार आसिफा हे पात्र साकारणारी अभिनेत्री सोनिया बलानी हिला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं तिने स्वतः स्पष्ट केलं आहे. ही भूमिका करण्यासाठी सोनियाने खूप मेहनत घेतली. सुरुवातीला नकारात्मक पात्र असल्याने ते करावं की नाही या संभ्रमात ती होती पण आता ती याकडे एक आव्हान म्हणून बघते, शिवाय अशा भूमिका करणाऱ्या लोकांना ह्या धमक्या मिळतच असतात असंही ती म्हणाली.
उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे मीडियाशी संवाद साधताना सोनियाने या गोष्टींचा खुलासा केला. शिवाय या आसिफा या पात्रात आणि तिच्यात बरीच तफावत असल्याचंही तिने स्पष्ट केलं. चित्रपटावर काम करण्याआधी सोनियाने अशा ७००० पीडित तरुणींची भेट घेतली आणि त्यांची कहाणी जाणून घेतली. ‘सुरवीन दुग्गल शो’मधून सोनियाने या मनोरंजनक्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तीने २०१६ च्या ‘तुम बिन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शिवाय सैफ अली खानच्या ‘बाजार’ या चित्रपटातही तिने काम केलं. ‘द केरला स्टोरी’ हा सोनियाचा तिसरा चित्रपट आहे.