अभिनेता शाहरुख खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतीच शाहरुखने बॉलिवूडमध्ये ३१ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्याचे चाहते त्याचे फोटो व व्हिडीओ आनंद व्यक्त करत आहेत. यानिमित्ताने शाहरुखने ट्विटरवर #AskSRK सेशन ठेवलं. यामध्ये त्याला चाहत्यांनी अनेक मजेदार प्रश्न विचारले व त्याची उत्तरं त्याने दिली.
कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत
“व्वा आत्ताच समजले की दिवाना प्रदर्शित होऊन ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. सर्वांना धन्यवाद आणि आपण ३१ मिनिटं #AskSRK करू शकतो??” असं त्याने ट्वीट केलं. त्यानंतर चाहत्यांचे प्रश्न व शाहरुखची उत्तरं सुरू झाली.
एका चाहत्याने त्याला विचारलं की ‘तू ५७व्या वर्षीही अॅक्शन स्टंट कसे परफॉर्म करतो?’ त्यावर ‘खूप साऱ्या पेनकिलर्स खाव्या लागतात भावा’, असं उत्तर शाहरुखने दिलं.
‘सोबत सिगारेट प्यायला येणार का?’ असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. ‘त्यावर मी माझ्या वाईट सवयी एकटाच करतो’, असं उत्तर शाहरुखने दिलं.
दरम्यान, शाहरुखला बॉलिवूडमध्ये ३१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर २५ जून रोजी चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत होते. त्याने चाहत्यांसाठी वेळ काढत #AskSRK सेशन ठेवलं आणि त्यांच्या मजेदार प्रश्नांची उत्तरं दिली.