बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. जानेवारी (२०२३) महिन्यात रिलीज झालेल्या ‘पठाण’ चित्रपटानंतर शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु झाली. जवानकडून किंग खानच्या चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी १ महिना बाकी राहिला असताना शाहरुखने ट्विटरवर ‘आस्क एसआरके’ (#AskSRK)सेशन घेतले आहे. या वेळी शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना शाहरुखने भन्नाट उत्तरे दिली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “लैंगिक शिक्षणाबाबत मुलीशी संवाद साधलाय का?”, प्रश्नाला उत्तर देत पंकज त्रिपाठी म्हणाले, “भारतातील कुटुंबांमध्ये…”

किंग खानला त्याच्या एका चाहत्याने‘आस्क एसआरके’सेक्शनमध्ये “शाहरुख सर शिव्या द्या, पण मला रिप्लाय द्या”, अशी अजब मागणी केली होती. या प्रश्नाला उत्तर देत शाहरुख म्हणाला, “तेरी बात का बैदा मारू…, जॅकी श्रॉफकडून मी हा डायलॉग शिकलो आहे. खूश?” हा डायलॉग म्हणजे शिवी नाही असे शाहरुखने कंसात नमूद केले आहे. तसेच या उत्तरापुढे त्याने #Jawan असे लिहिले आहे.

हेही वाचा : “अवघ्या २ दिवसांत…”, ‘सुभेदार’च्या ट्रेलरने रचला नवा विक्रम! चिन्मय मांडलेकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

ट्विटरवर आणखी एका चाहत्याने “जवान चित्रपटासाठी मी प्रचंड तयारी करत आहे.”असे म्हटले होते, त्या युजरला शाहरुखने शुभेच्छा दिल्या आहेत. याच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानने हे आस्क एसआरके सेशन घेतले होते. ‘जवान’चे दिग्दर्शन अ‍ॅटलीने केले आहे. त्यामुळे शाहरखच्या चित्रपटात आपल्याला पहिल्यांदाच तगडी दाक्षिणात्य स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : Video: आर्या आंबेकरपाठोपाठ रोहित राऊतही करणार अभिनयात पदार्पण, प्रोमो समोर

‘जवान’ पुढच्या महिन्यात ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये शाहरुख खानसह नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी असे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asksrk session shah rukh khan reveals new non gaali he learnt from jackie shroff sva 00