अभिनेता सुनील शेट्टीच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. त्याची लेक अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल लग्नबंधनात अडकणार आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची तयारी सुरू झाली आहे. राहुलचं पाली हिल इथलं घर आकर्षक विद्युत रोषणाईने सजलं आहे, तर दुसरीकडे शेट्टी कुटुंबही लग्नाची तयारी करताना दिसत आहे. अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेले अथिया व राहुल अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाची तयारी सुरू; विद्युत रोषणाईनं सजलं क्रिकेटपटूचं मुंबईतील घर

राहुल-अथियाच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. पण अद्याप त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल दोन्ही कुटुंबांनी किंवा स्वतः अथिया-राहुलने खुलासा केलेला नाही. अशातच राहुलच्या घराची सजावट पाहून दोघांचं लवकरच लग्न होणार असल्याचं म्हटलं जातंय. याच सर्व चर्चांदरम्यान अथिया शेट्टी मुंबईतील एका सलूनबाहेर दिसली. त्याठिकाणी तिला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं. लग्न कधी आहे, असं विचारताच अथिया लाजली आणि गाडीत बसून निघून गेली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल व अथिया २३ जानेवारी रोजी खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसमध्ये लग्नबंधनात अडकतील. दोघांच्या लग्नात मित्र-मैत्रिणी आणि मोजकेच नातेवाईक उपस्थित असतील. या लग्नाची तयारी खंडाळा येथील फार्म हाऊसमध्येही सुरू असल्याचं म्हटलं जातंय.

राहुल-अथिया एकमेकांना २०१८ पासून डेट करत आहेत. ते एकमेकांबरोबर वेळ घालवताना आणि एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करतानाही दिसतात.