Athiya Shetty-KL Rahul new Home: सुनील शेट्टीची लाडकी लेक व जावयाने मुंबईत आलिशान घर घेतलं आहे. अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) यांनी मुंबईतील वांद्रे याठिकाणी एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या जोडप्याचे नवीन अपार्टमेंट वांद्र्याच्या पाली हिलमधील एका इमारतीत आहे आणि या अपार्टमेंटची किंमत तब्बल २० कोटी रुपये आहे.

वांद्रे हा मुंबईतील सर्वात पॉश परिसर आहे, याठिकाणी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी राहतात. शाहरुख खान, सलमान खान, टायगर श्रॉफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, सैफ अली खान, करीना कपूर खान यांसारखे अनेक बॉलीवूड कलाकार याच भागात राहतात. आता, अथिया शेट्टी आणि केएल राहुल या सेलिब्रिटींचे शेजारी होतील. इकोनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, या जोडप्याने संधू पॅलेस बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावर ३,३५० चौरस फूट जागा असलेले आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटमध्ये चार कार पार्किंगची जागा देखील मिळणार आहे. संधू पॅलेस ही वांद्रे येथील नर्गिस दत्त रोडवर असलेली १८ मजली इमारत आहे.

बाथरूममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यावर उर्वशी रौतेला मॅनेजरवर संतापली; म्हणाली, “मी लगेच…”

Athiya Shetty KL Rahul
अथिया शेट्टी व केएल राहुल (फोटो – इन्स्टाग्राम)

अथिया व राहुल यांनी १५ जुलै रोजी नोंदणी शुल्क म्हणून १.२० कोटी रुपये आणि ३० हजार रुपये मुद्रांक शुल्क भरले. या इमारतीला बीएमसीकडून फक्त पार्शियल ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाले आहे, त्यामुळे अथिया व राहुल याठिकाणी कधी राहायला जातील की हे अपार्टमेंट त्यांनी फक्त गुंतवणुकीसाठी घेतले आहे ते अद्याप स्पष्ट नाही.

प्रसिद्ध अभिनेत्याने वडिलांबरोबरचा ‘तो’ सीन पाहून शर्मिला टागोर यांना मारली होती झापड; म्हणाला, “आजही जेव्हा मी…”

आमिर खानने पाली हिलमध्ये घेतली प्रॉपर्टी

काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता आमिर खानने पाली हिलमध्ये अपार्टमेंट खरेदी केले. आमिरने पाली हिलमध्ये खरेदी केलेली मालमत्ता ‘रेडी-टू-मूव्ह-इन’ आहे. हे अपार्टमेंट अंदाजे १,०२७ चौरस फुटाचे आहे. २५ जून रोजी झालेल्या डीलनुसार यासाठी त्याने ३० हजार रुपये नोंदणी शुल्क व ५८.५ लाख स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क भरले आहे. त्याच्या या अपार्टमेंटची किंमत ९.७५ कोटी रुपये आहे. आमिर खानची नवीन मालमत्ता पाली हिल परिसरातील बेला विस्टामध्ये आहे. याशिवाय आमिर खानचा मरीना अपार्टमेंटमध्ये एक आलिशान फ्लॅट आहे जो पाली हिलमध्येच आहे.

Story img Loader