Athiya Shetty KL Rahul Baby Girl Name : अभिनेत्री अथिया शेट्टी व केएल राहुल नुकतेच आई-बाबा झाले. अथियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अथिया व केएल राहुलची लाडकी लेक तीन आठवड्यांची झाली आहे. त्यांनी आता त्यांच्या मुलीचं नाव जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर या जोडप्याने लेकीबरोबरचा एक सुंदर फोटोही पोस्ट केला आहे.

अथिया शेट्टीने २४ मार्च रोजी मुलीला जन्म दिला. अथिया व केएल राहुल यांचं हे पहिलंच बाळ आहे. बाबा झाल्यावर केएल राहुल आयपीएलचा सामना सोडून मुंबईत आला होता. अथियाने आता इन्स्टाग्रामवर एक फॅमिली फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी मुलीचं नाव सांगितलं आहे.

फोटोमध्ये केएल राहुलने लाडक्या लेकीला जवळ घेतलंय आणि अथिया तिच्याकडे प्रेमाने बघतेय. “आमची लाडकी लेक, आमचं सर्वस्व.
? Evaarah/ इवारा ~ Gift of God” असं कॅप्शन अथियाने या फोटोला दिलं आहे.

पाहा पोस्ट

अथिया शेट्टीच्या या पोस्टवर चाहत्यांनी तसेच कलाकारांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, समांथा रूथ प्रभू यांनी या पोस्टवर रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. अनेकांना अथिया व केएल राहुल यांनी त्यांच्या मुलीसाठी जे नाव निवडलं ते आवडलं असून कौतुक केलं आहे.

अथिया शेट्टी व केएल राहुल यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर दोन वर्षांपूर्वी २३ जानेवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांचे लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर पार पडलं होतं. या लग्नाला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि क्रिकेटविश्वातील व सिनेइंडस्ट्रीतील काही मोजकेच लोक उपस्थित राहिले होते. लग्नाला दोन वर्षे पूर्ण होताच या जोडप्याने आनंदाची बातमी शेअर केली. त्यानंतर मार्च महिन्यात अथिया व केएल राहुल एका गोंडस लेकीचे आई-बाबा झाले.