अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल आज लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्नगाठ बांधतील. दोघांच्या लग्नासाठी खंडाळ्यातील बंगला सजला आहे. आज लग्न असल्याने रविवारी रात्री संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या संगीत सोहळ्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आज की पार्टी मेरी तरफ से’! Athiya Shetty-KL Rahulच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल

अथिया शेट्टी व केएल राहुल यांच्या संगीत सोहळ्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. सुनील शेट्टींच्या बंगल्याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. इथं पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. तसेच बॉलिवूड गाण्यांवर पाहुणे डान्स करताना दिसत आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावर पाहुण्यांनी डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

याशिवाय ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’, यासह अनेक गाण्यांवर पाहुण्यांनी डान्स केला. या सोहळ्यातील अथिया शेट्टी व राहुलचे फोटो समोर आलेले नाहीत, पण चाहते उत्सुकतेने या नवीन जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओंची वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Athiya shetty kl rahul sangeet ceremony guest dance on besharam rang song video viral from khandala farm house hrc