अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल आज लग्नबंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्म हाऊसवर दोघांचं लग्न होणार आहे. लग्नाची तयारी पूर्ण झाली असून रविवारी दोघांचं संगीत होतं. या संगीत सोहळ्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये घरातील सदस्य व पाहुणे जोरदार डान्स करताना दिसत आहेत.
सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर संगीत पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं माध्यमांना आतमध्ये परवानगी देण्यात आली नसली तरी संगीत नाईटचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. व्हायरल व्हिडिओंमध्ये बंगल्यातील आकर्ष विद्युत रोषणाई पाहायला मिळत आहे. तसेच ‘आज की पार्टी मेरी तरफ से’ गाण्याचा आवाज येतोय.
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये संगीत सोहळ्यात काही जण नाचताना दिसत आहेत. सुप्रसिद्ध बॉलिवूड गाण्यांवर डान्स करताना काही सदस्य दिसत आहेत.
दरम्यान, रविवारी दुपारी सुनील शेट्टी खंडाळा बंगल्यावर पोहोचले, तेव्हा अथिया व राहुल दोघांनाही तुमच्याकडे नक्की घेऊन येणार. तेव्हा तुम्हाला आम्हाला जे प्रश्न विचारायचा आहेत ते विचारा,” असं त्यांनी फोटोग्राफर्सना सांगितलं.