Actress Athiya Shetty- Cricketer KL Rahul : अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता हे बहुचर्चित कपल विवाहबंधनात अडकलं आहे. आज ४.३० वाजता अथिया व केएल राहुलचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. लवकरच हे दोघंही प्रसार माध्यमांसमोर येणार आहेत. त्याचपूर्वी सुनील शेट्टी व त्याचा लेक अहान शेट्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Photos : सुनील शेट्टीने लेकीच्या लग्नासाठी असं सजवलं खंडाळा येथील फार्म हाऊस, फोटोंमध्ये दिसली झलक

सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर अथिया व केएल राहुलचा विवाहसोहळा पार पडला. अगदी मोजक्याचा लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. विवाहसोहळा संपन्न होताच सुनील शेट्टीने लेकासह प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिठाई वाटली. यावेळी सुनील शेट्टीच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता.

सुनील शेट्टीच्या साधेपणाचं कौतुक

विशेष म्हणजे लेकीच्या लग्नासाठी सुनील शेट्टीने केलेला लूक अगदी लक्षवेधी ठरला. त्याने परिधान केलेल्या कपड्यांवरुन त्याचा साधेपणा दिसून आला. लुंगी, कुर्ता सुनील शेट्टीने परिधान केला होता. तसेच त्यावर त्याने माळ घातली होती. इतकंच नव्हे तर पायामध्ये कोल्हापूरी चप्पल सुनील शेट्टीने घातली. तर अहानचाही लूक चर्चेचा विषय ठरला.

आणखी वाचा – Athiya Shetty-KL Rahul Wedding : पाहुणेमंडळींना ताटामध्ये नव्हे तर केळीच्या पानात वाढणार जेवण, लग्नात कोणत्या प्रकारचे पदार्थ असणार?

अहानने बहिणीच्या लग्नासाठी पांढऱ्या रंगाचा डिझायनर कुर्ता व जॅकेट परिधान केलं होतं. सुनील शेट्टी यांच्या साधेपणाचं सध्या कौतुक होत आहे. तसेच लग्न झाल्यानंतर लगेचच मिठाई वाटत त्याने आनंद व्यक्त केला. आता अथिया व केएल राहुलच्या लग्नाच्या फोटोंकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Story img Loader