Actress Athiya Shetty- Cricketer KL Rahul Updates: अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल आज लग्नबंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्म हाऊसवर दोघांचं लग्न होणार आहे. लग्नाची तयारी पूर्ण झाली असून रविवारी दोघांचं संगीत होतं. या संगीत सोहळ्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये घरातील सदस्य व पाहुणे जोरदार डान्स करताना दिसत आहेत.

Live Updates

KL Rahul-Athiya Shetty Wedding Updates : अथिया शेट्टी-केएल राहुलच्या विवाहसोहळ्याचे अपडेट्स

18:56 (IST) 23 Jan 2023
लेकीच्या लग्नाबद्दल सुनील शेट्टीची पहिली प्रतिक्रिया

“खूप सुंदर आणि लहानसा सोहळा होता. खूप जवळचे कुटुंबीय हजर होते. लग्नाचा सोहळा छान झाला. फेरेही झाले आणि लग्न अधिकृतपणे झालंय," अशी प्रतिक्रिया सुनील शेट्टीने दिली.

सविस्तर वृत्त इथे वाचा

18:41 (IST) 23 Jan 2023
Athiya Shetty-KL Rahul Wedding : लुंगी, सदरा अन् कोल्हापुरी चप्पल; लेकीच्या लग्नात सुनील शेट्टीच्या साधेपणाने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

KL Rahul-Athiya Shetty Marriage : अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुलच्या लग्नातील सुनील शेट्टीचा लूक समोर, लग्नानंतर वाटली मिठाई

सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

17:58 (IST) 23 Jan 2023
मुलीच्या लग्नातील सुनील शेट्टींचा लूक पाहिलात का?

अथिया शेट्टी व केएल राहुल विवाह बंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टी यांनी मुलगा अहान शेट्टीबरोबर पापाराझींना पोज दिल्या. तसेच मिठाईदेखील वाटली.

17:01 (IST) 23 Jan 2023
अथिया-केएल राहुलच्या लग्नासाठी पाहुण्यांचं आगमन

अथिया शेट्टी व केएल राहुल यांच्या लग्नासाठी निमंत्रित पाहुणे खंडाळा येथील फार्म हाऊसवर पोहोचत आहेत.

16:36 (IST) 23 Jan 2023
अथिया-केएल राहुलच्या लग्नासाठी पोहोचल्या कृष्णा श्रॉफ, अंशुला कपूर

अथिया शेट्टी व केएल राहुलच्या लग्नासाठी तिच्या मैत्रिणी कृष्णा श्रॉफ व अंशुला कपूर फार्म हाऊसवर पोहोचल्या आहेत.

16:19 (IST) 23 Jan 2023
मुलाच्या लग्नासाठी फार्म हाऊसवर पोहोचली केएल राहुलची आई

अथिया व केएल राहुलच्या लग्नाला सुरुवात झाली आहे. मुलाच्या लग्नासाठी केएल राहुलची आई फार्म हाऊसवर पोहोचली आहे. ईटाईम्सने यासंदर्भात वृत्त दिलंय.

15:51 (IST) 23 Jan 2023
सुनील शेट्टीने ‘या’ एका कारणामुळे के.एल राहुलला जावई म्हणून दिला होकार

सुनील शेट्टीने ‘या’ एका कारणामुळे के.एल राहुलला जावई म्हणून दिला होकार सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

15:42 (IST) 23 Jan 2023
अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाला पोहोचला क्रिकेटपटू इशांत शर्मा

अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाला क्रिकेटपटू इशांत शर्मा पोहोचला आहे.

15:21 (IST) 23 Jan 2023
अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुलची लगीनघाई, लग्नानंतर हनिमूनला न जाण्याचा निर्णय, कारण…

अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुलची लगीनघाई, बहुचर्चित कपलच्या हनिमूनची चर्चा

सविस्तर बातमी इथे वाचा

15:00 (IST) 23 Jan 2023
संजय दत्तने दिल्या अथिया-केएल राहुलला शुभेच्छा

अभिनेता संजय दत्तने अथिया शेट्टी व केएल राहुलला लग्नबंधनात अडकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

14:47 (IST) 23 Jan 2023
इशा देओलने दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

इशा देओलने अथिया शेट्टी व केएल राहुल यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

14:38 (IST) 23 Jan 2023
Photos : सुनील शेट्टीने लेकीच्या लग्नासाठी असं सजवलं खंडाळा येथील फार्म हाऊस, फोटोंमध्ये दिसली झलक

अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या विवाहसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर हा विवाहसोहळा पार पडले. या फार्म हाऊसचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

14:12 (IST) 23 Jan 2023
Athiya Shetty- KL Rahul थोड्याच वेळात घेणार सात फेरे

अथिया शेट्टी व केएल राहुल थोड्याच वेळात लग्न बंधनात अडकतील. ते खंडाळा येथील फार्म हाऊसवर सात फेरे घेतील.

13:36 (IST) 23 Jan 2023
अथिया-राहुलच्या कपड्यांबदद्ल माहिती समोर

आपल्या लग्नासाठी अथिया आणि राहुल यांनी लाल नाही, तर पांढऱ्या आणि सोनेरी रंगाचे कपडे निवडले आहेत.

सुंदर डिझाईन, लाखांच्या घरात किंमत… ‘असा’ असेल अथिया शेट्टी-के.एल राहुल यांचा लग्नसोहळ्यातील पोशाख

12:58 (IST) 23 Jan 2023

Athiya Shetty-KL Rahul Wedding: प्रोफेसर आहेत अथिया शेट्टीचे सासू-सासरे; के.एल.राहुलच्या कुटुंबियांबद्दल जाणून घ्या

अथिया शेट्टी-के.एल.राहुल आज लग्नगाठ बांधणार आहेत. के.एल.राहुलच्या कुटुंबियांबद्दल जाणून घ्या.

संपूर्ण बातमी येथे वाचा

12:45 (IST) 23 Jan 2023

Photos: अथिया शेट्टीच्या वाढदिवशी के.एल.राहुलने दिलेली प्रेमाची कबुली, जाणून घ्या त्यांची फिल्मी लव्हस्टोरी

अथिया शेट्टी-के.एल.राहुल आज लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांची लव्हस्टोरी जाणून घेऊया.

के.एल.राहुल-अथिया शेट्टीची लव्हस्टोरी

12:43 (IST) 23 Jan 2023
अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नात विराट कोहली-अनुष्का शर्मा लावणार हजेरी

अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नात विराट कोहली-अनुष्का शर्मा उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सलमान खान, शाहरुख खानदेखील असतील, अशी माहिती समोर आली आहे.

12:27 (IST) 23 Jan 2023
Athiya Shetty-KL Rahul Wedding : पाहुणेमंडळींना ताटामध्ये नव्हे तर केळीच्या पानात वाढणार जेवण, लग्नात कोणत्या प्रकारचे पदार्थ असणार?

अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या विवाहसोहळ्याबाबत नवी माहिती समोर आली आहे. या शाही विवाहसोहळ्यात जेवणही खास असणार आहे.

सविस्तर बातमी इथे वाचा

12:11 (IST) 23 Jan 2023
अथिया शेट्टी-केएल राहुलच्या संगीतमध्ये अर्जुन कपूरची हजेरी

अथिया शेट्टी-केएल राहुलच्या संगीतमध्ये अर्जुन कपूरने हजेरी लावली. यावेळी त्याची बहीण अंशुला कपूरदेखील होती.

12:07 (IST) 23 Jan 2023
अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नात कोणते सेलिब्रिटी लावणार हजेरी

अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल खंडाळा येथील फार्म हाऊसमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. दोघांच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली असून या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत. यापैकी काही पाहुण्यांची नावं समोर आली आहेत.

इथे वाचा सविस्तर वृत्त

12:00 (IST) 23 Jan 2023

KL Rahul-Athiya Shetty Wedding: लग्न मुहुर्ताच्या वेळेबाबत मोठी माहिती समोर

भारतीय क्रिकेटर के.एल.राहुल व अथिया शेट्टी आज विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या मुहुर्ताबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

11:59 (IST) 23 Jan 2023
Athiya Shetty- KL Rahul मुंबईत देणार ग्रँड रिसेप्शन

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन आयोजित केलं जाईल.

सविस्तर बातमी इथे वाचा

11:57 (IST) 23 Jan 2023
अथिया व राहुलच्या लग्नामध्ये कोणत्या पद्धतीचं जेवण असणार?

अथिया व राहुलच्या लग्नामध्ये कोणत्या पद्धतीचं जेवण असणार हेदेखील समोर आलं आहे. दाक्षिणात्य पद्धतीचं जेवण लग्नामध्ये असणार आहे. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांना कोणत्याही प्लेटमध्ये जेवण वाढण्यात येणार नाही. केळीच्या पाणांमध्ये पाहुणे मंडळींना जेवण देण्यात येणार आहे.

सविस्तर बातमी इथे वाचा

athiya-shetty-wedding

अथिया शेट्टी-केएल राहुल विवाह बंधनात अडकणार

Story img Loader