सोशल मीडियावर सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची. अथिया आणि केएल राहुल २३ जानेवारीला खंडाळा येथील त्यांच्या फार्महाऊसवर लग्नाच्या बेडीत अडकले. या खासगी विवाह समारंभात दोघांच्याही कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. लग्नानंतर राहुल आणि अथियाने सोशल मीडियावर प्री-वेडिंग फंक्शन्सचे अनेक फोटो शेअर केले आहेत. अशातच लग्नानंतर नवी नवरी अथिया शेट्टी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली. पण तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
लग्नानंतर अथिया शेट्टी पहिल्यांदाच मुंबईत सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली. पण यावेळी तिला पाहून सगळेच शॉक झाले. कारण नवीन नवरी असलेल्या अथियाच्या गळ्यात ना मंगळसूत्र होत ना, भांगेत सिंदूर, ना कपाळाला टिकली. याशिवाय तिचं वागण पाहूनही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अथिया शेट्टी एका सलूनमधून बाहेर पडताना दिसत आहे. तिच्या हातांवर मेहंदी होती आणि ती डेनिम आणि शर्ट अशा एकदम साध्या आणि कॅज्युअल लूकमध्ये दिसली. यावेळी तिला पाहून पापाराजी तिला शुभेच्छा देऊ लागले मात्र अभिनेत्रीने त्यांना काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि कारमध्ये बसून निघून गेली. यावरून नेटकऱ्यांनी अथियाला चांगलंच सुनावलं आहे.
आणखी वाचा- अथिया शेट्टीच्या लग्नात सुनील शेट्टीचे डोळे पाणावले; लेक सप्तपदी घेताना भावूक झाला अभिनेता
या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “हिचं अॅटीट्यूड तर पाहा. वडील एवढे नम्र आहेत पण या स्टारकिड्सना खूपच गर्व आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “फोटोग्राफर्सनी या स्टारकिड्सना जास्त महत्त्व देणंच बंद करायला हवं. एवढं अॅटीट्यूड चांगलं नाही.” तर आणखी एका युजरने लिहिलं, “या स्टारकिड्सच्या सासूबाई त्यांना गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर लावायला सांगत नसतील का?” याशिवाय इतरही अनेकांनी अथियाला रुक्ष वागण्यावर टीका केली आहे.