अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी तिच्या स्टाइल सेन्ससाठी ओळखली जाते. ती नुकतीच मुंबईतील एका कार्यक्रमात दिसली. यावेळी तिने पांढरा गाऊन परिधान केला होता. त्या पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये अथिया खूपच सुंदर दिसत होती, मात्र काहींना तिचा लूक आवडला नाही आणि तिला ट्रोल केलं. काही युजर्सनी तर ती बुरखा घालून आल्याचंही म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ओम राऊत ड्रग्ज घेतो”; ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील ‘ती’ चूक पाहून संतापले नेटकरी, म्हणाले, “सीता मातेच्या…”

अथियाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी तिला कमेंट्स करून ट्रोल करत आहेत. अथिया शेट्टी पांढऱ्या रंगाचा वन शोल्डर गाऊन घालून या कार्यक्रमात आली होती. तिने पापाराझींसमोर पोज दिली, पण लोक ती ज्या पद्धतीने एक्सप्रेशन देत होती, त्यावरून लोकांनी तिच्या लूकची खिल्ली उडवली आहे. काही लोक तिचे पती केएल राहुलचे नाव घेऊनही तिला ट्रोल करत आहेत.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अथिया शेट्टीच्या व्हिडीओवर युजर्स कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, ‘तिचा चेहरा मुलींसारखा नाही, तिचा चेहरा सुनील शेट्टीसारखा आहे, तिला पाहिल्यावर ती मुलगी असल्यासारखं वाटत नाही.’ दुसर्‍या युजरने कमेंट केली, ‘काय बोलावे कळत नाही. हाईट बॉडी चांगली आहे, पण तिला मोजकेज कपडे शोभतात. तिने साडी आणि सलवार सूट परिधान करावे, त्यात ती चांगली दिसते.’

नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स

दरम्यान, या इव्हेंटला श्वेता बच्चन, अनन्या पांडे, सोनम कपूर, खुशी कपूर, कनिका कपूर, रेखा, विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Athiya shetty trolled for wearing white gown at event hrc