बॉलिवूड गाण्यांमधून लोकप्रियता मिळवणाऱ्या आतिफ अस्लमचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. या सुप्रसिद्ध गायकाला एका वर्षापूर्वी कन्यारत्नाचा लाभ झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आतिफची पत्नी साराने २३ मार्च २०२३ला गोंडस बाळाला जन्म दिला आणि सोशल मीडियावरुन आतिफने बाबा झाल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आज (२३ मार्च रोजी) आतिफ त्याच्या गोंडस मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे त्यानिमित्ताने आतिफने पहिल्यांदाच त्याच्या मुलीचा हलीमाचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा… IPL सामन्यांतून ‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघाचा मालक शाहरुख खान करतो कोटींची कमाई; जाणून घ्या

आतिफ अस्लमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. बरोबर एका वर्षानंतर आज पहिल्यांदाच त्याने हलीमाचा चेहरा जगासमोर आणला आहे. पहिल्या फोटोत बाबा आतिफ हलीमाबरोबर खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत सफेद फ्रॉकवर हलिमा एकदम गोंडस दिसत आहे. या पोस्टला आतिफने कॅप्शन देत लिहिले, “बाबाने राजकन्येचे शूज खिशात ठेवले आहेत, जेव्हा माझ्या हलीमाला तो हवा असेल तेव्हा ती सांगेल. २३/०३/२०२३- तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.”

आतिफच्या लाडक्या लेकीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोसटवर आतिफच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, “किती सुंदर आहे हलीमा, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”. “अल्लाह तुमच्या जीवनात आनंद आणि आशीर्वाद घेऊन येवो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गोंडस हलीमा” असं दुसऱ्याने लिहिलं.

हेही वाचा… ‘गुलाबी साडी…’, मराठी गाण्यावर आजीसह थिरकली अदा शर्मा; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, आतिफ अस्लमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, २०१३मध्ये आतिफने साराशी लाहौरमध्ये निकाह केला होता. त्यांना अब्दुल व अर्यान ही दोन मुले आहेत आणि हलीना त्यांची तिसरी अपत्य आहे. पाकिस्तानी सिंगर असलेल्या आतिफने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. त्याची अनेक गाणी लोकप्रिय आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atif aslam reveled daughter haleema face for the first time on her birthday dvr