Baby John Teaser: गेल्या वर्षी अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. शाहरुख खानची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. त्यानंतर आता अॅटलीचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येत आहे. ‘बेबी जॉन’ असं अॅटलीच्या नव्या चित्रपटाचं नाव असून याचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘बेबी जॉन’ चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीने केलं नसून तो निर्माता आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘बेबी जॉन’ चित्रपटाचे पोस्टर्स प्रदर्शित झाले होते. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. पण, आता ‘बेबी जॉन’च्या जबरदस्त टीझरमुळे प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘जिओ स्टुडिओ’च्या अधिकृत युट्यूब चॅनलवर ‘बेबी जॉन’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. १ मिनिट ५७ सेकंदाच्या टीझर अॅक्शन, भावनिक सीन्स पाहायला मिळत आहेत. या टीझरवरून वरुण धवन दुहेरी भूमिकेत झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘बेबी जॉन’ चित्रपटात वरुण धवनबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री कीरथि सुरेश आणि वामिका गब्बी रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे ‘बेबी जॉन’ चित्रपटाच्या टीझरमधील अभिनेते जॅकी श्रॉफच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटात ते खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘बेबी जॉन’ चित्रपटाच दिग्दर्शन कलीस यांनी केलं असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा – Bigg Boss 18: “मला करणवीरचा जीव घ्यायचा आहे”, एलिस कौशिकने दिली थेट धमकी, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
दरम्यान, यंदाच्या वर्षातील वरुण धवनचा हा शेवटचा चित्रपट आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर २५ डिसेंबरला ‘बेबी जॉन’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याआधी या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बऱ्याचदा बदलण्यात आली होती. ‘बेबी जॉन’ हा तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. अॅटलीने दिग्दर्शित केलेल्या ‘थेरी’ चित्रपटाचा ‘बेबी जॉन’ रीमेक असून ऑरिजिनलमध्ये थलपति विजय, समांथा रुथ प्रभु आणि एमी जॅक्सन झळकले होते. अलीकडेच अॅटली म्हणाला होता की, ‘बेबी जॉन’ ‘थेरी’ चित्रपटाचा रीमेक असला तरी कथेत एक ट्विस्ट जोडला आहे.