Jawan Trailer : शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा एक प्री-रिलीज इवेंट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाहरुखच्या या आगामी चित्रपटाची गाणीदेखील प्रदर्शित करण्यात आली. आता नुकताच ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे ज्याची प्रेक्षक फार आतुरतेने वाट बघत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुख खानने मध्यंतरी एका पोस्टच्या माध्यमातून या ट्रेलर प्रदर्शनाच्या तारखेबद्दल माहिती दिली होती. दुबईच्या सर्वात मोठ्या ‘बुर्ज खलिफा’ या इमारतीवर ‘जवान’चा ट्रेलर पाहता येणार असल्याची माहिती शाहरुखने या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिली होती. अखेर प्रतीक्षा संपली असून ‘जवान’चा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे.

ही गोष्ट एका वडील आणि मुलाच्या नात्याची आहे. शाहरुख खान या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार असून चित्रपटाचा ट्रेलर पूर्णपणे दमदार अॅक्शन आणि डायलॉग्सनी भरलेला आहे. ट्रेलरमधून नेमकं कथानक समोर येत नसलं तर वडील आणि मुलाच्या बदल्याची ही गोष्ट आहे हे स्पष्ट झालं आहे. शाहरुख खानबरोबरच नयनताराचा दमदार अंदाजही यात पाहायला मिळत आहे, शिवाय याबरोबरच शाहरुख आणि नयनतारा यांच्यातील प्रेम कहाणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : ‘गदर २’ रचणार इतिहास; सलमान आणि आमिरच्या नावे असलेला ‘हा’ रेकॉर्ड सनी देओल लवकरच मोडणार

विजय सेतुपती या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार असून त्याचा या चित्रपटातील लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. ट्रेलरमध्ये शाहरुख खानचे वेगवेगळे लूक आणि खिळवून ठेवणारे असे अॅक्शन सीन्स हे जास्त लक्ष वेधून घेत आहेत. शिवाय विजय सेतुपती व शाहरुख खान यांच्यातील एक वेगळीच जुगलबंदी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवयाल मिळणार आहे.

चित्रपटात दीपिका पदूकोणचीही महत्त्वाची भूमिका आहे आणि तिची झलकही आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. एकूणच ‘पठाण’प्रमाणे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात ‘जवान’ कुठेच कमी पडणार नाही हे ट्रेलरवरुन स्पष्ट झालं आहे. शिवाय भावूक करणारं कथानक आणि सोबतीला देशभक्तीची जोड यामुळे चित्रपटाला एक वेगळाच टच मिळाला आहे.

चित्रपटात सुनील ग्रोव्हर, सान्या मल्होत्रा, प्रियामणी व गिरिजा ओक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याचं संगीत अनिरुद्धने दिलं आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित ‘जवान’ ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. येत्या शुक्रवारपासून भारतात याचं अडवांस बुकिंग सुरू होणार आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.