अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, सुनील ग्रोवर, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘जवान’ चित्रपटाला अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आता या भरघोस यशानंतर अॅटलीच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला असून याचा व्हिडीओ समोर आला आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून अॅटलीच्या या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू होती. अखेर निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘वीडी १८’ असं या चित्रपटाच नाव आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवनबरोबर दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री कीर्ति सुरेश झळकणार आहे. आज मकर संक्रांतीचं औचित्य साधून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या मुहूर्त पूजेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा – Video: किली पॉलने ‘बॉइज ४’ चित्रपटातील ‘या’ गाण्यावर केली रील; अवधूत गुप्ते, गौरव मोरे पाहून म्हणाले…
या व्हिडीओत, मुहूर्त पूजेसाठी अॅटली, निर्माते आणि चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित राहिलेले पाहायला मिळत आहे. वरुण धवन, कीर्ति सुरेश, वामिका गब्बी हे सर्व मुहूर्त पूजेसाठी पारंपरिक लूकमध्ये आले होते. ‘वीडी १८’ या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी संपूर्ण टीमने देवाचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात केली.
हेही वाचा – Video: “मला नका सांगू…”, पापाराझींवर पुन्हा भडकल्या जया बच्चन, नेटकरी म्हणाले, “भाव नका देऊ”
दरम्यान, अॅटली या चित्रपटाचा दिग्दर्शक नसून निर्माता आहे. ज्योति देशपांडे आणि मुराद खेतानी यांच्यासह तो ‘वीडी १८’ चित्रपटाची निर्मिती करत आहे. दिग्दर्शनाची धुरा तमिळ दिग्दर्शक कलीस सांभाळणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून कीर्ति पहिल्यांदाच हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. शिवाय वामिकाचं देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण होत आहे.