शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाकडे सध्या सगळयांचंच लक्ष लागलं आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. परदेशात या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. भारतातही या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची सुरुवात झाली आहे. अशातच शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक खास भेट आहे. ती म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांना फक्त ५५ रुपयात बघता येणार आहे.

‘पठाण’ या चित्रपटासाठी शाहरुखचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. अशातच या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत हळूहळू समोर येत आहे. काही ठिकाणी या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत हजाराच्या घरात आहे तर काही ठिकाणी हा चित्रपट फक्त ५५ रुपयात पाहता येणार आहे. ही बातमी ऐकून शाहरुखचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. पण हा चित्रपट ५५ रुपयात पाहण्यासाठी काही अटीही आहेत.

neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
restrictions on sale of railway platform tickets lifted from 9 november
Railway Platform Tickets Available : फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध
Sachin Pilgaonkar ashok saraf starr navra maza navsacha 2 release on amazon prime
५० दिवसांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट आता ओटीटीवर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला? जाणून घ्या…
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी

आणखी वाचा : रजनीकांत यांच्या घरी असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिलात का?, लेकीने केलेली पोस्ट चर्चेत

२५ जानेवारी रोजी हा चित्रपट विविध भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनची तिकीटं प्रेक्षकांना ५५ रुपयात मिळू शकणार आहेत. हैदराबाद येथील देवी 70MM 4K Laser आणि RTC X Roads वरील डॉल्बी अटमॉसमध्ये ‘पठाण’ची तिकीटं ५५ रुपयाला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही हैदराबाद येथील रहिवासी असाल आणि चित्रपटाचं तेलुगू व्हर्जन पाहण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ५५ रुपयात हा चित्रपट पाहण्याची संधी मिळू शकते. फक्त हैदराबादच नाही तर दिल्लीमध्येही या ऑफरचा प्रेक्षकांना लाभ घेता येणार आहे. दिल्लीतील करोल बाग लिबर्टी सिनेमा येथे ५५ रुपयात प्रेक्षकांना पठाण २डी नॉन आयमॅक्स व्हर्जन पाहता येणार आहे.

हेही वाचा : “… म्हणून ‘पठाण’ हा चित्रपट तुम्ही पहायलाच हवा…” शाहरुख खानने उघड केलं कारण

या चित्रपटातून शाहरुख मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर परतताना दिसणार आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करताना दिसणार आहे.