आज एकाच दिवशी दोन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले.  एकीकडे अक्षय कुमारने राम सेतू आणला आहे, तर अजय देवगणचा ‘थँक गॉड’ हा चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. थँक गॉडमध्ये अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेत दिसत आहे.  

हेही वाचा : Bigg boss 16: अब्दू रोजिकची भारतातली पहिली दिवाळी ठरली खास, ‘बिग बॉस’च्या घरी मिळाले मोठे सप्राईज

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, मात्र या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही दृष्यांमुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाच्या आधी निर्मात्यांनीही या चित्रपटात काही बदल केले. आज अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण यात अजय देवगणपेक्षा सिद्धार्थ मल्होत्राच जास्त भाग खाऊन घेल्याचं चित्र दिसत आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजय देवगण सारखा अनेक वर्ष मनोरंजन सृष्टीत काम केलेला अभिनेता या चित्रपटात असतानाही प्रेक्षकांना मात्र सिद्धार्थ मल्होत्राचं काम आवडलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी ट्वीट करत सिद्धार्थच्या या कामचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “सणासुदीच्या दिवसांसाठी ही परफेक्ट फॅमिली फिल्म आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “सिद्धार्थ मल्होत्राच्या कामाने या चित्रपटाला बहार आणली.” आणखी एका नेटकऱ्याने ट्वीट केलं, “सिद्धार्थ मल्होत्राने या चित्रपटात उत्कृष्ट काम केलं आहे.”  

हेही वाचा : Photos: प्रेक्षकांचा ‘थॅंक गॉड’वरील राग निवळणार?, चित्रपटात करण्यात येणार ‘हे’ मोठे बदल

या चित्रपटात अजय देवगणसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि राकुल प्रीतची महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली गेली. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तीन दिवस आधी या चित्रपटात काही मोठे बदल करण्यात आले आणि आता या चित्रपटाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत.

Story img Loader