‘आदिपुरुष’मुळे आधीच प्रेक्षक वैतागले असताना त्यांच्या हाती आता आणखी एक आयतं कोलीत मिळालं आहे. जुन्या सुपरहीट गाण्यांचा रिमेकचा ट्रेंड तर सुरू आहेच, पण आता नव्या सिंगल म्हणून प्रदर्शित केलेल्या गाण्यांचाही रिमेक करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. मध्यंतरी ‘मनिके मागे’ या सिंहिली भाषेतील गाण्याची वेगवेगळी वर्जन्स आपल्याला ऐकायला मिळाली होती. तसंच आता पाकिस्तानी कोक स्टुडिओमुळे लोकप्रिय झालेलं ‘पसूरी’ या गाण्याचंसुद्धा नवं रिमेक गाणं सध्या चर्चेत आहे.

कार्तिक आर्यन व कियारा अडवाणी यांच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात या सुपरहीट गाण्याचं रिमेक केलं आहे. नुकतंच चित्रपटातील हे गाणं प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर लोकांनी याला जबरदस्त ट्रोल करायला सुरुवात केली आहे. लोकांना हे नवं रिमेक गाणं अजिबात पसंत पडलेलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : ६०० कोटींच्या ‘आदिपुरुष’चा ३०० कोटींचा टप्पा पार करण्यासाठी संघर्ष सुरूच; ११ व्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई

हे गाणं कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीवर चित्रित झालं आहे, पण तरी लोकांनी त्यांची नापसंती दर्शवली आहे. सोशल मीडियावर या गाण्याला ट्रोल करणारी बरीच मजेशीर मीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे गाणं ऐकून बऱ्याच लोकांना ‘अपरिचित’ चित्रपटातील “इसकेलीये गरुड पुराणमे अलग सजा है” हा डायलॉग आठवला आहे.

या मीम्सच्या माध्यमातून लोकांनी बॉलिवूडच्या कल्पकतेवर शंका उपस्थित केली आहे. या नव्या गाण्याला अरिजित सिंग आणि शे गिल या दोघांनी आवाज दिला आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट यावर्षी २९ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‘सत्यनारायण की कथा’ असे होते, पण काही कारणास्तव यात बदल करुन ‘सत्यप्रेम की कथा’ असे नाव ठेवण्यात आले. कार्तिक-कियारासह या चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader