Auron Mein Kahan Dum Tha box office collection day 2 : ९०च्या दशकातील बॉलीवूडमधल्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अजय देवगण आणि तब्बूची जोडी. या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. अजूनही ९०च्या दशकातील या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. सध्या ही जोडी चांगलीच चर्चेत आहे आणि याचं कारण आहे ‘औरों में कहां दम था’ हा नवा चित्रपट. २ ऑगस्टला प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. पुन्हा एकदा अजय व तब्बूच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटाने पहिल्या दिवसांपेक्षा दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे.

अजय देवगण आणि तब्बूच्या ‘औरों में कहां दम था’ ( Auron Mein Kahan Dum Tha ) चित्रपटाला प्रेक्षकांप्रमाणे समीक्षकांचा देखील सरासरी प्रतिसाद मिळत आहे. तसंच सोशल मीडियाच्या प्रसिद्धीपेक्षा मौखिक प्रसिद्धीने हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत अधिक पोहोचत असल्याचं म्हटलं जात आहे. ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील सुरुवात थोडी संथ गतीने झाली. अजय देवगणच्या या चित्रपटाची १५ वर्षातील सर्वात कमी ओपनिंग मानली जात आहे. पण दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

horiba India Hydrogen vehicle
चाकणमध्ये हायड्रोजन वाहन इंजिन चाचणी सुविधा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Suspicion of explosives in air-conditioned coach of Dakshin Express panic among passengers
दक्षिण एक्स्प्रेसमध्ये तीन तास जीव मुठीत… प्रवाशांना अक्षरश: उड्या…
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
Auron Mein Kahan Dum Tha

हेही वाचा – Bigg Boss Marathi : ‘भाऊचा धक्का’ गाण्याचा गायक, गीतकार अन् संगीतकार आहे ‘बिग बॉस’मध्ये झळकलेला ‘हा’ स्पर्धक, पोस्ट करत म्हणाला…

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘औरों में कहां दम था’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १.८५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी कमाईत वाढ झाली. अजय व तब्बूच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २.१५ कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे दोन दिवसात ‘औरों में कहां दम था’ ( Auron Mein Kahan Dum Tha ) चित्रपटाने एकूण ४ कोटींचा व्यवसाय केला आहे.

हेही वाचा – “तुमचं वय घरी ठेवून या…”, ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीची ‘बिग बॉस’मधील वादावरून खोचक पोस्ट, म्हणाली, “मान अपमानाची अपेक्षा…”

अजय देवगण-तब्बूच्या चित्रपटात महेश मांजरेकरांची लेक महत्त्वाच्या भूमिकेत

‘औरों में कहां दम था’ चित्रपटात अजय देवगण व तब्बूसह महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकर झळकली आहे. याशिवाय शांतनु माहेश्वरी, जिमी शेरगिल महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. दरम्यान, ‘ए वेडनेसडे’, ‘बेबी’ आणि ‘स्पेशल २६’ सारखे थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी ‘औरों में कहां दम था’ ( Auron Mein Kahan Dum Tha ) या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘आरआरआर’ चित्रपटासाठी ऑक्सर जिंकणारे एम.एम. कीरावानी यांनी अजय व तब्बूच्या चित्रपटाचं म्युझिक केलं आहे.

Story img Loader