Saif Ali Khan Attack Updates: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात दरोडेखोर शिरला होता. तो सैफ व करीनाचा धाकटा मुलगा जेहवर हल्ला करणार होता. मुलाला वाचवण्यासाठी सैफची त्या दरोडेखोराबरोबर झटापट झाली. याचदरम्यान दरोडेखोराने केलेल्या हल्ल्यात सैफ जखमी झाला. त्यानंतर सैफला रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आलं. सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षाचालकाने या घटनेबद्दल भाष्य केलं आहे.

रिक्षा चालक भजनसिंह राणाने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की सैफने रिक्षात बसल्यावर त्याला “रुग्णालयात पोहोचायला किती वेळ लागेल?” असा प्रश्न विचारला होता.

मदतीसाठी ओरडत होती महिला

“मी रिक्षा घेऊ जात होतो आणि अचानक मला गेटमधून आवाज आला. मुख्य गेटजवळ एक महिला मदतीसाठी ‘रिक्षा थांबवा’ म्हणत ओरडत होती. सुरुवातीला मला तो सैफ अली खान आहे हे माहीत नव्हतं. मला वाटलं की कोणत्यातरी सामान्य व्यक्तीवर हल्ला झाला आहे,” असं राणा म्हणाला.

सैफबरोबर कोण होतं?

रिक्षा चालकाने सांगितलं की सैफ चालू शकत होता, तो स्वत: चालत रिक्षामध्ये बसला होता. “ते (सैफ अली खान) स्वत: माझ्याकडे चालत आले आणि रिक्षामध्ये बसले. ते जखमी अवस्थेत होते. त्यांच्याबरोबर एक लहान मूल आणि आणखी एक व्यक्ती होती. माझ्या ऑटोमध्ये बसल्यानंतर लगेचच सैफ अली खानने मला रुग्णालयात पोहोचायला किती वेळ लागेल असं विचारलं,” असं रिक्षा चालक म्हणाला.

“त्यांच्या मानेतून आणि पाठीतून रक्तस्त्राव होत होता. त्याचा पांढरा कुर्ता लाल झाला होता, आणि खूप रक्तस्त्राव होत होता. मी भाडंही घेतलं नाही. त्यावेळी मी त्यांना मदत करू शकलो,” असं चालकाने सांगितलं.

दरम्यान, ५४ वर्षीय सैफवर सध्या मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, गुरुवारी पहाटे वांद्रे भागातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये एका घुसखोराने हल्ला केला. त्याच्या मानेवर, पोटात आणि पाठीवर चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीरातील चाकुचा तुकडा काढला आहे. सैफची प्रकृती सध्या चांगली असून तो लवकरच बरा होईल. डॉक्टरांनी त्याला दोन ते तीन दिवसांनी डिस्चार्ज देणार असल्याचं सांगितलं. मानेवरील जखम खोल असल्याने त्याला दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Story img Loader