सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाचा प्रदर्शित होताच त्यावर टीका होत आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चित्रपटाची कथा चार महिलांची आहे ज्यांना मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही या चित्रपटावर भाष्य केलं. हा ‘आरएसएस’चा अजेंडा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चित्रपटाची कथा ही अदा शर्माच्या पात्राबद्दल भाष्य करणारी आहे जीचं धर्मपरिवर्तन करून तिला ISIS मध्ये सामील करण्यात आलं. तब्बल ३२००० महिलांना अशाप्रकारे ISIS मध्ये भरती करण्यात आल्याचा दावादेखील हा चित्रपट करत आहे. एकीकडे या चित्रपटाला कडाडून विरोध होत आहे तर दुसरीकडे काही लोकांनी या चित्रपटाला ‘द काश्मीर फाइल्स’सारखं डोक्यावर घ्यायला सुरुवात केली.

kalki koechlin struggle in bollywood
पहिल्या सिनेमानंतर ‘या’ अभिनेत्रीकडे नव्हतं दोन वर्षं काम, वडापाववर काढले दिवस; लोकल ट्रेनने केला प्रवास, खुलासा करत म्हणाली…
Arjun Kapoor
जान्हवी की खुशी सावत्र बहि‍णींपैकी अर्जुनच्या जवळची कोण?…
sonam khan bold photoshoot in 1990
‘या’ अभिनेत्रीने ९० च्या दशकात केलेलं बोल्ड फोटोशूट; आईने पाहिल्यावर केलेलं असं काही की…, तिनेच केला खुलासा
Tanya Singh
“माझ्या मुलीचा मृत्यू कॅन्सरने झालेला नाही…”, लेकीच्या निधनानंतर चार महिन्यांनी कृष्ण कुमार यांच्या पत्नीचा मोठा खुलासा
Amitabh Bachchan
“अमिताभ बच्चन यांच्या डोक्यावर मारल्याने…”, ‘सिकंदर का मुकद्दर’मधील ‘या’ अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा….
Shilpa Shetty and Raj Kundra
Shilpa Shetty and Raj Kundra : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडचणीत, घर आणि ऑफिसवर ईडीची धाड
aashiqui movie was made for TV
टीव्हीवर प्रदर्शित होणार होता ‘आशिकी’ सिनेमा, गाणी हिट झाल्यावर बनवला चित्रपट, बजेट होतं फक्त ‘इतके’ लाख
I Want To Talk box office collection Day 7
अभिषेक बच्चनचा ‘आय वॉन्ट टू टॉक’ बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला; करिअरमधील सर्वाधिक कमी कलेक्शनची नोंद

आणखी वाचा : “त्यादिवशी मी दोन बादल्या भरून चॉकलेट्स…” हृतिक रोशनने सांगितला ‘धूम अगेन’ गाण्यामागील धमाल किस्सा

काही धार्मिक संघटनांनी हा चित्रपट मोफत दाखवण्याची जाहिरात केली आहे तर आळंदी इथल्या एका रिक्षा चालकाने तर थेट या चित्रपटासाठी मोफत रिक्षासेवाच सुरु केल्याची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील पुणे, आळंदी येथे राहणारे रिक्षाचालक साधू मगर यांनी हा पुढाकार घेतला असून त्यांचा हा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांना ते मोफत सेवा पुरवणार असल्याचं त्यांनी त्यांच्या रिक्षेवर छापलं आहे.

केवळ एवढंच नव्हे महिलांसाठीसुद्धा मगर यांनी खास ऑफर ठेवली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या पहिल्या १० महिलांना ते मोफत रिक्षासेवेसह चित्रपटाचे तिकीटदेखील मोफत देणार आहेत. हिंदू महिलांनी हा चित्रपट पहावा आणि या इस्लामी कटांबद्दल त्यांनी आणखी जागरूक आणि सतर्क राहावे अशी इच्छा मगर यांनी ‘ऑप इंडिया’शी संवाद साधताना व्यक्त केली. यासाठी ते ही मोफत सेवा पुरवत आहेत. साधू मगर हे अक्कलकोट शहरातील रहिवासी आहेत. आळंदी आणि मरकळ परिसरात ते ऑटोरिक्षा चालवतात.