अभिनेत्री अवनीत कौरने वयाच्या नवव्या वर्षापासूनच तिच्या करिअरची सुरूवात केली. २०१०मध्ये ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’च्या रिअॅलिटी शोमध्ये तिने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. डान्सर अवनीतने दोन वर्षानंतर अभिनय क्षेत्रासाठीची वाटचाल सुरू केली. २०१२ रोजी प्रसारित झालेल्या ‘मेरी मॉं’ या मालिकेमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मग अनेक मालिका, चित्रपट, वेब सीरिज तसेच म्युझिक व्हिडीओ करत तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं. अभिनेत्रीने नुकतीचं कान्स फिल्म फेस्टिवललादेखील हजेरी लावली होती. अशातच आता अवघ्या २२ वर्षांच्या अवनीत कौरने साखरपुडा केला की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
हेही वाचा… गश्मीर महाजनीला मिळते अक्षय कुमारकडून प्रेरणा; अभिनेता म्हणाला, “मी दररोज…”
अवनीत सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनय क्षेत्राबरोबरच वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता अवनीतने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फाटोमध्ये अवनीतने गुलाबी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केलाय. मिनिमल मेकअप आणि तिच्या मॅचिंग नेल आर्टने तिने हा लूक पूर्ण केलाय. पण अवनीतच्या अंगठीने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलंय. अभिनेत्रीने शेअर केलेल्या दोन्ही फोटोत अवनीत तिची अंगठी दाखवतेय यामुळेच अवनीतचा साखरपुडा झालाय की काय या चर्चांना उधाण आलंय.
अवनीतचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अभिनेत्रीच्या व्हायरल झालेल्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सदेखील केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत विचारलं, “तिने साखरपुडा केलाय का?” तर दुसऱ्याने लिहिलं, “मला वाटतंय की तिने साखरपुडा केला असावा.” तर अनेकांनी तिच्या होणारा पती कोण असेल याचे तर्कवितर्क लावायला सुरुवात केलीय.
“चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. मी या युनियनबद्दल आणि पुढे काय होणार आहे हे जगाला सांगण्याची प्रतीक्षा करू शकत नाही” असं कॅप्शन अवनीतने या फोटोला दिलं आहे.
हेही वाचा… ‘हीरामंडी’ फेम ताहा शाह करतोय प्रतिभा रांताला डेट? अभिनेता म्हणाला, “मी प्रेमपत्र…”
दरम्यान, अवनीत कौर नक्की कोणती गुड न्यूज देणार आहे हे चाहत्यांना लवकरच कळेल. ‘लव्ह इन व्हिएतनाम’ या चित्रपटात अवनीत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे नुकताच अनावरण करण्यात आले.