गेल्यावर्षी बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड जोरावर असतानाच गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी प्रचंड वाद निर्माण झाला होता तरी प्रेक्षकांनी तिकीटबारीवर यासाठी गर्दी केली अन् हा चित्रपट सुपर डुपर हीट ठरला. या चित्रपटाच्या पुढील भागाची प्रेक्षक आता आतुरतेने वाट बघत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोविड काळानंतर प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने जगभरात ४३१ कोटींचा गल्ला जमवला. दिग्दर्शक अयान मुखर्जी याने ह्या चित्रपटाची कथा तीन भागात उलगडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नुकतंच एका मुलाखतीमध्ये अयानने या चित्रपटाच्या उरलेल्या २ भागांबद्दल भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्र २ आणि ३ या दोन्ही भागावर एकत्रच काम करणार असल्याचं स्पष्ट केलं.

आणखी वाचा : …म्हणून ‘बॉम्बे’ चित्रपटात काम न करण्याचा लोकांनी दिलेला सल्ला; मनीषा कोईराचा खुलासा

‘न्यूज १८’ या मीडिया पोर्टलशी संवाद साधताना अयान म्हणाला, “आम्ही ब्रह्मास्त्र २ आणि ३ वर एकत्रच काम सुरू करणार आहोत. खरं सांगायचं तर या दोन्हीची कथा लिहिण्यासाठी आम्ही जरा जास्त वेळ घेणार आहोत. मला माहिती आहे याचया पुढील भागांसाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. पण त्याआधी आम्ही लिखणावर कोणतीही तडजोड न करता मेहनत घेणार आहोत. यासाठी जवळपास ३ वर्षं आम्हाला लागू शकतात.”

इतकंच नव्हे तर पुढील भागाच्या कथेबरोबरच त्याच्या संवादांवरही अयान मुखर्जी मेहनत घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या चित्रपटाला थिएटरप्रमाणेच ओटीटीवर प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय प्रमुख भूमिकेत होते. आता या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणवीर सिंग किंवा केजीएफ स्टार यश दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चाहते या चित्रपटाच्या पुढील दोन्ही भागांसाठी खूप उत्सुक आहेत.