अभिनेत्री आयेशा झुल्का हिने तिच्या अभिनयाने 90चं दशक गाजवलं. ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटातील तिची आणि आमिर खानची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. त्यानंतरही तिने अक्षय कुमार, सकमान खान यांच्याबरोबर अनेक चित्रपटात स्क्रीन शेअर केले. तिच्या कामाबरोबर तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात घेतलेला निर्णय यामुळे ही प्रेक्षकांचं तिच्याकडे लक्ष वेधलं गेलं. यशस्वी अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली असतानाच तिने २००३ साली बिझनेसमॅन समीर वाशीशी लग्न केलं आणि त्यानंतर मनोरंजनसृष्टीपासून ती दूर राहिली. २०२२ मध्ये पुन्हा एकदा तिने मनोरंजनसृष्टीत पुनरागमन केलं. त्यांच्या लग्नाला १९ वर्षे झाली असून त्यांना आजही मूलबाळ नाही. याचं कारण काय? स्वतः आयेशा झुल्काने याबाबत माहिती दिली आहे.

‘ई टाइम्स’च्या एका वृत्तानुसार आयेशाने कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल ती म्हणाली, “मला वाटायचं की, जर मी लग्न केलं नाही तर मी स्वातंत्रपणे जगू शकते. पण एकदा मी माझ्या आई आणि बहिणीबरोबर समीरला भेटले. त्याला भेटता क्षणीचा माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे असं मला वाटलं. त्याला भेटल्यावर लग्नाबद्दलचे माझे विचार बदलले आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
The Nagpur Bench of Bombay High Court ruled on girls entitlement to maintenance
अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मिळू शकते? न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय….
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”

आणखी वाचा : “ही कला आहे की अश्लीलता…” ‘पठाण’च्या वादावर भाष्य करताना मिलिंद सोमणला आठवलं त्याचं न्यूड फोटोशूट

लग्नाला १९ वर्ष होऊनही आजपर्यंत तिला मूल नाही, याबाबतही तिने मोकळेपणाने भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळेच मी कधीच आई न होण्याचा निर्णय घेतला. या माझ्या निर्णयात माझ्या पतीनेही मला खूप चांगली साथ दिली आहे. मला स्वतःचं मूल नसलं तरीही आणि समीरने गुजरात मधील दोन गावं दत्तक घेतली आहेत. असच त्या गावातील १६० मुलांची जेवणाची शिक्षणाची सगळी जबाबदारी आम्ही घेतो आणि त्यातून मला खूप आनंद मिळतो.”

हेही वाचा : मला आजही मनिषाची आठवण येते- नाना पाटेकर

दरम्यान आयेशा सध्या ओटीटीवर रमलेली आहे. नुकतेच ती ‘हुश हुश’ या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यामुळे ती या सिरीजमुळे चांगलीच चर्चेत आहे.

Story img Loader