२००४ साली ‘टार्जन द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी आयशा टाकिया ( Ayesha Takia ) पुन्हा एकदा प्लास्टिक सर्जरीनंतरच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. कारण अलीकडेच तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. पण या फोटोमधील आयशाचा लूक पाहून तिला जबरदस्त ट्रोल केलं. या ट्रोलिंगनंतर आयेशाने एक मोठा निर्णय घेतला. तिने थेट इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केलं. आयशाचा ‘तो’ फोटो कोणता होता? नेमकं झालं? जाणून घ्या…
एकेकाळी नॅशनल क्रश ठरलेल्या आयशा टाकियाने ( Ayesha Takia ) आपल्या सौंदर्याने अनेकांची मनं जिंकली होती. तिच्या सौंदर्याचा मोठा चाहता वर्ग तयार झाला होता. पण प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर आयशा पूर्णपणे बदलून गेली. तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलर्सना तिने बऱ्यादाचा सडेतोड उत्तर दिलं. पण यावेळेस तसं मात्र घडलं नाही. तिने थेट इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – लग्नाच्या तीन वर्षांनंतर अंकिता लोखंडे होणार आई? मित्र अली गोनीने केला खुलासा!
अलीकडेच आयशाने ( Ayesha Takia ) गाडीतला एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळाली. निळ्या रंगाची सिल्क साडी तिने नेसली होती. ज्यावर तिने एक गोल्डन नेकलेस घातला होता. आयशाचा हा लूक पाहून नेटकरी हैराण झाले आणि तिला ट्रोल करू लागले. “हे काय करू ठेवलंय?”, “हे असं काही करायची गरज होती का?”, “अत्यंत वाईट दिसतेस”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या होत्या.
आयशाला ( Ayesha Takia ) या फोटोवरून सतत ट्रोल केलं जात होता. अखेर तिने नाराज होऊन इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केलं. आता तिचं अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट ओपन होतं नाहीये. आयशा टाकिया आझमी असं तिच्या अकाउंटचं नावं होतं. २ मिलियनहून अधिक फॉलोअर्स होते. तसंच ती स्वतः ७ हजारांहून अधिक जणांना फॉल करत होती. तिने आतापर्यंत १२९० पोस्ट्स शेअर केल्या होत्या.
याआधी फेब्रुवारी महिन्यातही तिला लूकवरून ट्रोल केलं होतं. तेव्हा आयशाने ( Ayesha Takia ) भलीमोठी पोस्ट लिहून ट्रोलर्सना चांगलंच उत्तर दिलं होतं. दरम्यान, आयशाने ‘टार्जन द वंडर कार’नंतर ‘डोर’, ‘नो स्मोकिंग’, ‘वाँटेड’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. नागेश कुकुनूरच्या ‘मोड’ चित्रपटात ती शेवटची झळकली होती.