अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादीचा नेता फहाद अहमदशी लग्न केलं आहे. स्वराच्या आंतरधर्मीय लग्नानंतर तिच्यावर टीका केली जात आहे. त्याच्याशी लग्न करताना तू घरातला फ्रीज पाहिला होतास का, अशी टीका साध्वी प्राचींनी श्रद्धा वालकरचा उल्लेख करत केली होती. अयोध्येचे महंत राजू दास यांनी स्वरा भास्करला लग्नावरून चांगलंच सुनावलं आहे.
“स्वरा भास्कर जर एक सशक्त महिला असेल तर तिने लग्नच केले नसावे. पण जर तिला १००० पुरुषांबरोबर रात्री घालवायच्या असतील तर तिचं अभिनंदन. कारण तिने अशा समाजातील व्यक्तीशी लग्न केलं आहे, जिथे भाऊ-बहिणी लग्न करतात आणि नंतर तलाक, तलाक, तलाक करतात,” राजू दास म्हणाले.
Video: “हे असले चाळे…” ‘त्या’ व्हिडीओमुळे ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात ट्रोल
“स्वरा भास्करने उघडपणे इंशा अल्लाह आणि भारत तेरे टुकडे होंगे असं म्हटलं होत. १० दिवसांपूर्वी भाऊ म्हणून संबोधित केलेल्या व्यक्तीशी तिने नोंदणी पद्धतीने लग्न केले आणि लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले,” असंही अयोध्याचे महंत राजू दास म्हणाले.
साजिद खान Bigg Boss 16 मधील ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? नाव वाचून व्हाल चकित
स्वरा व फहादने जानेवारी महिन्यात नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी १६ फेब्रुवारीला साखरपुडा केला. आता मार्च महिन्यात ते थाटामाटात लग्न करणार आहेत.