भारतीय क्रिकेटर शुबमन गिल सध्या त्याच्या आयपीएलमधील दमदार खेळीमुळे चर्चेत आहे. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या शुबमनने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. शुबमन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकेटचं मैदान गाजवणारा शुबमन अनेक जाहिरांतीतही झळकला आहे. शुबमनने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका जाहिरातीदरम्यान शूट केलेला हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये शुबमनने जाहिरातीसाठी वेगळा लूक केल्याचं दिसत आहे. शुबमनबरोबर या जाहिरातीत रोहित शर्मा व श्रेयस अय्यरही झळकले आहेत.

हेही वाचा>> नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अडचणी संपता संपेना, जाहिरातीतील ‘त्या’ कृत्यामुळे वकिलाने केली तक्रार, नेमकं प्रकरण काय?

शुबमनने जाहिरातीसाठी सूट व मिशी लावून हटके लूक केला आहे. तर श्रेयस अय्यरने ड्रायव्हरचे कपडे घातल्याचे दिसत आहे. रोहित शर्माच्या लूकही खास आहे. “सर, कोणती भूमिका हवी असेल तर सांगा. पीएच्या भूमिकेत मी तयार आहे. मिशीवगैरे पण लावली आहे,” असं शुबमन या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

हेही वाचा>> रितेश देशमुखने भर कार्यक्रमात मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाला, “तुम्ही महाराष्ट्रासाठी…”

शुबमन गिलचा हा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओवर बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने कमेंट केली आहे. “आमच्या पोटावर पाय का मारतोस भाऊ?” अशी कमेंट आयुष्मानने केली आहे. आयुष्मानच्या या कमेंटवर शुबमनने रिप्लाय केला आहे. “अरे सर, तुम्ही तर मजा घेत आहात,” असं म्हणत शुबमनने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushmann khurrana commented on shubman gill advertise video cricketer reply kak