बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आयुष्मानच्या बहुचर्चित ‘ड्रीम गर्ल २’चा पहिला टीझर काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
आयुष्मानच्या चित्रपटातील ड्रीम गर्ल पूजाने तिच्या लाघवी आवाजाने भल्याभल्यांना वेड लावलं होतं. आता याच पूजाची झलक ड्रीम गर्ल २मध्ये पाहायला मिळणार आहे. ड्रीम गर्ल २च्या टीझरमध्ये आयुष्मान खुराणाच्या स्त्री वेशातील पात्राची झलक पाहायला मिळत आहे. लाल साडी नेसून ग्लॅमरस लूक केल्याचं टीझरमध्ये दिसत आहे.
‘ड्रीम गर्ल २’च्या दुसऱ्या टीझरमध्ये पूजा फोनवर बोलताना दिसत आहे. पलिकडून सलमान खान बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. पूजाने भाईजान म्हणताच “भाई मी दुसऱ्यांसाठी आहे तुझ्यासाठी फक्त जान आहे. तुझ्यामुळे आजपर्यंत मी लग्न केलेलं नाही” असं सलमान खान म्हणत आहे. सलमान खानने पूजाला चेहरा दाखवण्यासाठी व्हिडीओ कॉल करताच लाइट गेल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ‘ड्रीम गर्ल २’चा हा मजेदार टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आयुष्मान खुराणाने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन हा टीझर शेअर केला आहे.
हेही वाचा>> “IPL ही एक भेळ आहे” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य, म्हणाली “ऑस्ट्रेलियन माजोरडे…”
‘ड्रीम गर्ल २’ चित्रपट ७ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, विजय राज, मनोज जोशी, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी आणि मनज्योत सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत तर एकता कपूर या चित्रपटाची निर्माती आहे.