अभिनेता आयुष्मान खुरानावर काही दिवसांपूर्वीच दुःखाचा डोंगर कोसळला. १९ मे रोजी चंदीगढ येथे आयुष्मानचे वडील पंडीत पी खुराना यांचं निधन झालं. ते काही दिवसांपासून ते हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर चंदीगड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पंडीत पी खुराना यांच्या निधनानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब कोलमडून गेलं. आता आयुष्मानने वडिलांबाबत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

आयुष्मानने आई व भाऊ अपारशक्ती खुरानाबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघंही भाऊ आईचा हात धरत चालत आहेत. तर त्यांच्या पाठीमागे वडिलांचा फोटो दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये संपूर्ण खुराना कुटुंबीय पंडीत पी खुराना यांच्या फोटोला नमस्कार करताना दिसत आहे.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
Aai Ani Baba Retire Hot Aahet artis gave a special surprise to Nivedita Saraf on her birthday
Video: ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेतील कलाकारांनी निवेदिता सराफांना वाढदिवसानिमित्ताने दिलं खास सरप्राइज, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा – “कपड्यांवरून कुणाचीही मापं काढू नये” गावी जाऊन हेमांगी कवीने घातली मॅक्सी, फोटो पोस्ट करत म्हणाली, “मंडळातल्या…”

आयुष्मानने फोटो शेअर करत अगदी भावुक झाला आहे. त्याने वडीलांविषयी त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला, “आईची काळजी घ्यायची आहे आणि नेहमीच तिच्या बरोबर राहायचं आहे. वडिलांसारखं बनायला आपल्या वडिलांपासून खूप लांब जावं लागतं. पहिल्यांदाच असं वाटत आहे की, बाबा खूप लांब आणि आमच्या खूप जवळ आहेत”. याचबरोबरीने आयुष्मानने त्याच्या वडीलांचे आभारही मानले आहेत.

आणखी वाचा – गरोदर आहे अंकिता लोखंडे? बेबी बंप लपवतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आयुष्यमानची ही पोस्ट डोळ्यांत पाणी आणणारी आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी मंडळींनी कमेंट केल्या आहेत. तर त्याचे चाहतेही ही पोस्ट पाहून हळहळले आहेत. खुराना कुटुंबियांना अधिकाधिक ताकद मिळो असं सेलिब्रिटींनी कमेंट करत म्हटलं आहे. पंडीत खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ होते. ज्योतिषशास्त्राविषयी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. आयुष्मान खुराना व त्याच्या वडिलांचं अगदी जवळचं नातं होतं. अनेकदा आयुष्मान वडिलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा. वडिलांसाठी लिहिलेल्या खास पोस्टमधून आयुष्मान त्यांच्यप्रती असलेलं प्रेम व्यक्त करायचा.

Story img Loader