आयुष्मान खुराना हा बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या चित्रपटांमध्ये सामाजिक विषय हाताळले जातात. त्याने ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ज्यामध्ये त्याने विकी अरोरा या स्पर्म (शुक्राणू) डोनरची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. खरं तर त्याचा या चित्रपटातील कथेशी खऱ्या आयुष्यातही संबंध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राष्ट्रवादाच्या नावाखाली पैसे कमवणे….”, नसीरुद्दीन शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सत्य घटनांवर…”

आज आयुष्मानचा ३९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हा किस्सा नेमका काय आहे, ते जाणून घेऊयात. तर, त्याचा ‘विकी डोनर’ हा चित्रपट २०१२ मध्ये आला होता, पण त्यापूर्वी आयुष्मानने खऱ्या आयुष्यात मुलबाळ नसलेल्या जोडप्यांना मदत करण्यासाठी स्पर्म डोनेट केले होते. २०१८ मध्ये, ‘कॉफी विथ करण’च्या एपिसोडमध्ये आयुष्मान विकी कौशलसोबत आला होता. यामध्ये त्याने हा खुलासा केला होता. २००४ मध्ये त्याला ‘रोडीज’ या रिअॅलिटी शोच्या टास्कसाठी स्पर्म डोनेट करावे लागले होते, त्यावेळी तीन जण त्या टास्कसाठी सूटेबल होते, त्यापैकी एक आयुष्मान स्वतः होता. त्याने तत्कालीन अलाहाबादमध्ये स्पर्म डोनेट केले होते.

‘विकी डोनर’मध्ये त्याने एका स्पर्म डोनरची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा दूसरा भाग यावा, अशी त्याच्या चाहत्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. काही महिन्यांपूर्वी त्याला एका मुलाखतीत याबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा आयुष्मानने मजेशीर उत्तर दिलं होतं. “मला नक्कीच विकी डोनर २’ बनवायचा आहे, पण आत्ता नाही. मी हा चित्रपट आणखी १० वर्षांनी बनवेन. म्हणजे तोपर्यंत विकीची सगळी मुलं मोठी झाली असतील,” असं तो म्हणाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushmann khurrana has donated sperm in real life before doing vicky donor hrc
Show comments