Thama Movie: ‘मुंज्या’, ‘स्त्री २’ या चित्रपटांच्या यशानंतर मॅडॉक निर्मिती संस्थेने नव्या चित्रपटाची अधिकृतरित्या घोषणा केली आहे. मॅडॉकचे दिनेश विजनने ‘स्त्री २’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला या नव्या चित्रपटाची हिंट दिली होती. त्यानंतर आता त्याचा जबरदस्त टीझर शेअर करून चित्रपटातील कलाकारांचा खुलासा केला आहे.

‘थामा’ असं मॅडॉक निर्मिती संस्थेच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये ‘थामा’ चित्रपटाची एन्ट्री झाली आहे. ‘मुंज्या’ चित्रपटाचा मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार ‘थामा’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. मॅडॉकने ‘थामा’चा टीझर शेअर करत लिहिलं आहे, “दिनेश विजनच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये प्रेमकथेची गरज होती. पण दुर्दैवाने रक्तपात असलेली कथा मिळाली.”

हेही वाचा – Video: “…अन् तो अनार माझ्या आईच्या साडीला लागला”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजने सांगितला बालपणीचा ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

मॅडॉकच्या या आगामी चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. तर परेश राव आणि नवाजुद्दीने सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘थामा’ हा थरारक प्रेम कहाणी असणारा चित्रपट २०२५च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा निरेन भट्ट, सुरेश मैथ्यू आणि अरुण फुलारा यांनी लिहिली आहे.

हेही वाचा – Video: ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान माधुरी दीक्षित आणि कार्तिक आर्यनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: सासुरवाडीत झाली गडबड, सूर्या आणि डॅडी प्यायले भांग अन् मग…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नेमकं काय घडलं? वाचा

दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीला मॅडॉक निर्मिती संस्थेचा ‘मुंज्या’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. प्रदर्शित झाल्यानंतर ‘मुंज्या’ चित्रपटाने १.५ ते २ कोटींचा गल्ला जमवला होता. कोकणात प्रचलित असलेल्या मुंज्याच्या दंतकथेचा आधार घेत या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली होती. तसंच कोकणात चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा ‘मुंज्या’ चौथा चित्रपट होता. त्यानंतर ‘स्त्री २’ चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने छप्पर फाड कमाई केली. ‘स्त्री २’ने ६०० कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला होता. आता या सुपरहिट चित्रपटांनंतर ‘थामा’ला देखील तितकंच यश मिळतंय का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.