आयुष्मान खुराना व अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. २०१९ मध्ये आलेला ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यात आयुष्मानबरोबर नुरसत भरूचाची मुख्य भूमिका होती. पण ड्रीम गर्ल २ मध्ये नुसरतला डच्चू देण्यात आला आणि अनन्या पांडेला घेण्यात आलंय. याबद्दल काही दिवसांपूर्वी नुसरतने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता आयुष्यामान खुरानाने या रिप्लेसमेंटवर भाष्य केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“भारताशी शत्रुत्व असलं तरी…”, चांद्रयान ३च्या यशानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचं ट्वीट; स्वतःच्या देशाला सुनावत म्हणाली, “आपल्या दुर्दशेला…”

‘ड्रीम गर्ल २’मध्ये अनन्याला घेण्यात आल्यानंतर नुसरतने नाराजी व्यक्त केली होती. नुरसत म्हणाली, “मी ड्रीम गर्ल १ चा भाग होते. ती पूर्ण टीम मला खूप आवडते आणि त्यांच्याबरोबर काम करणं मी खूप मिस करत आहे. त्यांनी मला ‘ड्रीम गर्ल २’ मध्ये का घेतलं नाही, याचं उत्तर फक्त निर्माते देऊ शकतात. यामागचं लॉजिक किंवा उत्तर माझ्याकडे नाही. पण त्यांनी मला घेतलं नाही, त्यामुळे मला वाईट वाटलं, अन्याय झाल्यासारखं वाटलं. पण हा त्यांचा निर्णय आहे. ठीक आहे, हरकत नाही.”

दरम्यान, आता ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना आयुष्मान म्हणाला, “ही एक ऑर्गॅनिक डेव्हलपमेंट होती. चित्रपटाची कथा फ्रेश आहे, त्यामुळे त्यासाठी एका नव्या चेहऱ्याची गरज होती म्हणून अनन्याला घेण्यात आलं.” यावेळी आयुष्मान अनन्याचं कौतुक करत म्हणाला, “तिने खूप चांगलं काम केलं आहे. तिने मथुरा नावाच्या तिच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली. मथुराच्या अॅक्सेंटवरही तिने खूप काम केलं. तिच्याबरोबर काम करायला खूप मजा आली.”

आयुष्मान खुराना ‘ड्रीम गर्ल २’ मध्ये पुन्हा एकदा पूजाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात अन्नू कपूर, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी, विजय राज, परेश रावल, राजपाल यादव, मनोज जोशी आणि सीमा पाहवा यांच्याही भूमिका आहेत.