बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कोणाचाही पाठिंबा नसताना अल्पावधीतच अभिनेत्याने बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, बॉलीवूडमध्ये यशस्वी होण्याआधी त्याने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “माय हॉटी…” रणवीर सिंहच्या वाढदिवसानिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

आयुष्यमानला अभिनयाबरोबर गायनाची सुद्धा आवड आहे. काही वर्षांपूर्वी त्याने ‘इंडियन आयडॉल’ या शोसाठी ऑडिशन दिली होती. मात्र तेथून नाकारण्यात आल्यानंतर तो प्रचंड निराश झाला होता. याविषयी सांगताना अभिनेता म्हणाला, “मला अभिनयाबरोबर माझ्या गाण्याची आवडही जपायची होती. उत्तम गाणं गाता येणारा अभिनेता व्हायचे अशी माझी इच्छा होती. संगीताची आवड असल्याने मी एका शोचे सूत्रसंचालन केले. अनेकांनी रिजेक्ट केल्याने सुरुवातीच्या दिवसात अँकरिंग आणि रेडिओ जॉकी म्हणून काम पाहिले.”

हेही वाचा : “मासिक पाळीच्या तारखा विचारल्या” अमृता सुभाषने सांगितला ‘सेक्रेड गेम्स’मध्ये इंटिमेट सीन शूट करतानाचा अनुभव, म्हणाली…

आयुष्मान खुराना पुढे म्हणाला, “२००६ मध्ये मी ‘इंडियन आयडॉल २’ साठी ऑडिशन दिली होती. तेव्हा परीक्षकांकडून नाकारण्यात आल्यानंतर प्रचंड निराश झालो. मला अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला. मुंबईत येण्यापूर्वी अनेक शो मेकर्सकडून मला नकार कळवण्यात आला होता. त्यांनी दिलेला नकार, रिजेक्शमुळे जीवनात आज मी एवढा यशस्वी आहे.”

हेही वाचा : “माझ्या कुटुंबावर टीका करून काय मिळतं?” ट्रोलर्सच्या आक्षेपार्ह कमेंट्स पाहिल्यावर करण जोहर भडकला, म्हणाला…

दरम्यान, आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये त्याच्यासह अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आयुष्मान-अनन्यासह ‘ड्रीम गर्ल २’मध्ये परेश रावल, राजपाल यादव, असरानी, विजय राज, मनोज जोशी, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी आणि मनज्योत सिंह यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केली असून याची निर्मिती एकता कपूरने केली आहे.