‘विकी डोनर’, ‘अंधाधून’, ‘बरेली की बर्फी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आर्टिकल १५’ अशा वेगवेगळ्या प्रयोगशील चित्रपटांसाठी आयुष्मान खुराना ओळखला जातो. या प्रत्येक चित्रपटातून त्याने स्वतःला एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. आयुष्मान हा सध्या त्याच्या ‘डॉक्टर जी’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. आयुष्मानचे चाहते आणि सगळेच चित्रपटप्रेमी या नवीन चित्रपटासाठी उत्सुक आहेत. नेहमीप्रमाणेच आयुष्मान काहीतरी वेगळं कथानक मांडेल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. यामध्ये आयुष्मान स्त्रीरोगतज्ञ या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूड हंगामासही संवाद साधताना नुकताच आयुष्मानने त्याचा एका निर्मात्याबरोबर घडलेला किस्सा सांगितला आहे. आयुष्मानचे चित्रपट जेव्हा चांगलेच हीट ठरत होते तेव्हा त्याला एका निर्मात्याने गाठलं आणि त्यांनी आयुष्मानला एक ब्लँक चेक सही करून दिला. तो चेक देताना निर्माता त्याला म्हणाला, “तुला जेवढी रक्कम हवी आहे तेवढी तू यामध्ये भर, आमच्याबरोबर फक्त ३ चित्रपट कर, चित्रपटाची कथा वगैरे नंतर लिहू आपण.”

आणखी वाचा : आयुष्मान खुरानाचा ‘हा’ पहिलाच चित्रपट जो घरच्यांसमोर बघता येणार नाही; कारण जाणून घ्या

निर्मात्याने दिलेली ही ऑफर ऐकून आयुष्मान म्हणाला, “मी नेहमीच लक्ष्मीच्या आधी सरस्वतीला प्राधान्य देतो.” हा किस्सा सांगताना आयुष्मान म्हणाला, “मी नेहमीच प्रगतीशील चित्रपटाला प्राधान्य देतो. चित्रपट समाजात बदल घडवू शकतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मला नेहमीच सगळ्यांपेक्षा हटके आणि असामान्य अशा चित्रपटात काम करायचं होतं आणि सुदैवाने सध्या मला तसे चित्रपट मिळतही आहेत.”

इतकंच नाही तर आयुष्मान हा नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करण्यासाठी उत्सुक असतो. त्याचं म्हणणं आहे की नवीन लोकांबरोबर वेगवेगळे प्रयोग करता येतात आणि त्यामुळेच एक कलाकार म्हणून आपली प्रगती होते. येत्या १४ ऑक्टोबरला आयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुष्मानबरोबर रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शहा या महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushmann khurrana tells in interview that once producer offerd him black cheque for films avn