अभिनेते इरफान खान यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा बाबिल खान यानेही ‘काला’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाबिलला त्याच्या ‘काला’ या पहिल्या चित्रपटासाठी ‘आयफा’ सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : कमल हासन यांनी ‘द केरला स्टोरी’ला प्रोपगंडा म्हटल्यावर दिग्दर्शक सुदीप्तो सेन संतापले; म्हणाले, “चित्रपट न पाहता…”

‘आयफा’ पुरस्कार जिंकल्यावर तेथील उपस्थित मीडियाशी बोलताना बाबिलने वडील इरफान खान यांची आठवण काढली. या वेळी बाबिल म्हणाला, “मला त्यांची रोज आठवण येते. मला लहानपणी जास्त मित्र नव्हते तेव्हा माझे वडील हे माझे एकमेव मित्र होते. बाबांबरोबर हसत-हसत वेळ घालवणं ही आठवण मी कधीच विसरु शकत नाही.”

हेही वाचा : “पावसाळ्यात प्लास्टिकची सोय केलीस…” IIFA पुरस्कार सोहळ्यातील ‘त्या’ ड्रेसमुळे नोरा फतेही ट्रोल

इरफान खान यांनी केलेली कोणती भूमिका तुला करायला आवडेल या प्रश्नाला उत्तर देत बाबिल म्हणाला, “नाही…त्यांचे रोल मी रिक्रिएट का करेन? त्यांनी त्या सगळ्या भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारल्या आहेत.” आयफा पुरस्कार जिंकल्यावर बाबिलने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. पुढे तो म्हणाला, “भविष्यात मी आणखी मेहनत करून आयफाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकेन, यासाठी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्याबरोबर असून द्या.”

हेही वाचा : “चाळीतलं बालपण, शिवाजी पार्क ते बालमोहन शाळा…” प्रिया बापटचा थक्क करणारा प्रवास; म्हणाली, “दादर म्हणजे…”

‘काला’ हा चित्रपटात बाबिल खानसह तृप्ती डिमरी आणि स्वस्तिका मुखर्जी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आगामी काळात बाबिल शूजित सरकारची वेब सीरिज ‘द रेल्वे मेन’ मध्ये झळकणार आहे. इरफान खान यांच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीतील अनेक लोक त्याला पाठिंबा देत आहे. ‘काला’ हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येईल.