Babita Fogat On Dangal Movie Collection : भाजपाच्या नेत्या आणि माजी कुस्तीपटू बबिता फोगटने नुकताच ‘दंगल’ चित्रपटाबद्दल मोठा दावा केला आहे. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट बबिताचे वडील महावीर फोगट यांचा बायोपिक आहे. ‘दंगल’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाने संपूर्ण जगभरात २ हजार कोटींहून अधिक कमाई करत इतिहास रचला होता. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दंगल’ ब्लॉकबस्टर ठरला होता. याच चित्रपटाबद्दल बबिता फोगटने मोठा खुलासा केला आहे.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘दंगल’ चित्रपटात आमिर खान, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. फोगट कुटुंबीयांच्या खऱ्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला होता. याबद्दल महावीर फोगट यांची धाकटी लेक बबिता फोगटने ( Babita Fogat ) ‘न्यूज २४’ ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २ हजार कोटी कमावले पण, आम्हाला फक्त १ कोटी देण्यात आले असं सांगितलं.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…

हेही वाचा : दिवाळी पार्टीत रितेश देशमुखच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, बायकोसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “Green Flag…”

बबिता फोगट चित्रपटाबद्दल काय म्हणाली?

बबिता फोगटला ( Babita Fogat ) २ हजार कोटींपैकी तुम्हाला किती पैसे मिळाले असं विचारण्यात आलं. यावर बबिता म्हणाली, “आम्हाला १ टक्का पण नाही मिळालं. जवळपास फक्त १ कोटी मिळाले. याचं दु:ख होत नाही कारण, माझ्या वडिलांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे, आपल्याला लोकांचं प्रेम आणि सन्मान पाहिजे. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. कारण, त्या चित्रपटामुळे आम्हाला लोकांचं प्रचंड प्रेम मिळालं.”

हेही वाचा : लग्नानंतर ९ वर्षांनी मालिकाविश्वातील ‘मधुबाला’ झाली आई! वयाच्या ३९ व्या वर्षी दिला बाळाला जन्म, पोस्ट शेअर करत म्हणाली…

Babita Fogat
दंगल चित्रपटाबद्दल बबिता फोगटचा खुलासा ( Babita Fogat )

हेही वाचा : “शिमग्यातलं सोंग कुठेय?”, नवऱ्यावरून ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “स्वत:ची लायकी…”

दरम्यान, २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ चित्रपटात आमिर खानने महावीर फोगट यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी तर, निर्मिती आमिर खान, किरण राव आणि सिद्धार्थ रॉय कपूर केली होती. यामध्ये आमिर खान, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, झायरा वसीम, सुहानी भटनागर, साक्षी तन्वर, गिरीश कुलकर्णी, ऋत्विक साहोर आणि अपारशक्ती खुराना यांनी भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader