Baby John Box Office Collection Day 3: वरुण धवनचा यावर्षीचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘बेबी जॉन’ सध्या २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसला प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच निराशाजनक आहे. चित्रपटाच्या कमाईत सातत्याने मोठी घसरण होत आहे. त्यामुळे हा चित्रपट बजेटची रक्कम तरी कमवेल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बेबी जॉन’बद्दल हा थलपती विजयच्या ‘थेरी’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली कुमारने केले आहे. या चित्रपटात वरुण धवनबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर वामिका गब्बी आणि राजपाल यादव यांच्याही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाची कथा सामाजिक समस्यांवर भाष्य करते. यात ॲक्शन, रोमान्स आणि ड्रामा आहे. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे आकर्षित करू शकलेला नाही.

हेही वाचा – जगभर गाजलेला All We Imagine As Light ओटीटीवर रिलीज होणार; कधी, कुठे पाहता येणार सिनेमा? वाचा

बेबी जॉनचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘बेबी जॉन’ चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग केली. सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, सिनेमाने ख्रिसमसच्या दिवशी ११.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पण दुसऱ्या दिवशी यात ५७ टक्क्यांनी घसरण झाली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने केवळ ४.७५ कोटींचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशीही कलेक्शनमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ३.५९ रुपये कमावले आहेत. पहिल्या दिवसाच्या तुलनेत इतर दोन दिवसांमध्ये कलेक्शन कमी झाले आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत १९.५९ कोटी रुपये कमावले आहेत.

हेही वाचा – एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”

सिनेमागृहांमध्ये अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा २’ धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने जगभरात १७०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. भारतातही मोठ्या शहरांमध्ये या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल आहेत. याच दरम्यान, वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ रिलीज झाला. चित्रपट रिलीज झाला त्यादिवशी सुट्टी असल्याने कमाई चांगली झाली. मात्र नंतरचे दोन दिवस कमाईत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आता वीकेंडला म्हणजेच शनिवारी व रविवारी हा चित्रपट कशी कामगिरी करतो, त्याकडे निर्मात्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”

बेबी जॉनचे बजेट किती?

‘बेबी जॉन’च्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी मोठी रक्कम खर्च केली आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल १८० कोटी आहे. त्या तुलनेत तीन दिवसांची कमाई खूपच कमी आहे. वीकेंडला या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास कमाईचा आकडा वाढू शकतो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baby john box office collection day 3 varun dhawan film hrc