Baby John box office collection day 4 : वरुण धवनचा यावर्षीचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘बेबी जॉन’ सध्या २५ डिसेंबर २०२४ रोजी ख्रिसमसला प्रदर्शित झाला. तिसर्‍या दिवशी या चित्रपटाचे कलेक्शन खूपच निराशाजनक होते. तिसऱ्या दिवसाच्या तुलनेत चौथ्या दिवशी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर २० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, इतर चित्रपटांबरोबरच्या स्पर्धेमुळे आणि काही ठिकाणी चित्रपटाचे शो रद्द झाल्यामुळे या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही.

शुक्रवारी या सिनेमाचे कलेक्शन घसरून ३.६५ कोटी रुपये झाले होते, परंतु पहिल्या शनिवारी त्यात थोडी सुधारणा झाली असून, अंदाजे ४.२५ कोटी रुपये मिळवले आहेत, असे सॅकलिंकच्या सुरुवातीच्या डेटानुसार कळते. या चार दिवसांत चित्रपटाचे एकूण कलेक्शन अंदाजे २३.९० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हिंदी शोसाठी देशभरातील एकूण १४.६४% प्रेक्षकसंख्या नोंदवली गेली आहे.

Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
shalini passi marriage story
शालिनी पासीने २० व्या वर्षी केलं लग्न अन् २१ व्या वर्षी झाली आई; पतीसमोर ठेवली होती ‘ही’ अट, म्हणाली…
navi mumbai international airport distance from pune
Navi Mumbai International Airport: विमानतळ नवी मुंबईत, फायदा पुणेकरांचा! लोहगावपेक्षा या विमानतळाला प्राधान्य का?
Walmik Karad Arrested at Pune CID Office
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर संतोष देशमुखांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया…
Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…

हेही वाचा…Video: सलमान खानचा ५९वा वाढदिवस जामनगरमध्ये जल्लोषात साजरा, अंबानींनी आयोजित केलेली खास पार्टी, पाहा व्हिडीओ

कालीस यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘बेबी जॉन’ ला दोन मोठ्या चित्रपटाशी स्पर्धा करावी लागत आहे. ‘पुष्पा २’आणि हॉलिवूडचा अ‍ॅनिमेटेड सिनेमा ‘मुफासा: द लायन किंग’, (हिंदी डब) या सिनेमांबरोबर ‘बेबी जॉन’ची स्पर्धा आहे. ‘पुष्पा २’ जगभरात १५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडत आपले वर्चस्व राखत आहे. दरम्यान, ‘मुफासा’ ने देशांतर्गत १०० कोटी रुपये ओलांडले असून, २०२४ मधील असे यश मिळवणारा तिसरा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

‘ई टाइम्स’च्या वृत्तानुसार ‘बेबी जॉन’च्या अडचणींमध्ये भर म्हणजे, शनिवारी ‘बेबी जॉन’ चे काही शो रद्द झाल्याचे आणि त्याऐवजी उन्नी मुकुंदनच्या ‘मार्को’ चित्रपटाच्या (हिंदी व्हर्जनचे) शो लावण्यात आल्याचे अहवाल समोर आले. २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेला हा मल्याळम अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट चांगले रिव्ह्यू मिळवत आहे.

हेही वाचा…Sikandar Teaser : “सुना है की बहोत सारे…”, सलमान खानच्या बहुचर्चित ‘सिकंदर’चा टीझर प्रदर्शित; सिनेमाची रिलीज डेटही ठरली

मार्को, हनीफ अदेनी दिग्दर्शित चित्रपट, भारतात २९.९ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन आणि जगभरात ५७ कोटी रुपये कमावले आहेत. यशाच्या पार्श्वभूमीवर उन्नी मुकुंदन यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर जाहीर केले की त्यांना हिंदीत १४० हून अधिक शो मिळालेआहेत. हा चित्रपट १ जानेवारी २०२५ ला तेलुगूमध्येही प्रदर्शित होणार असून त्याच्या कमाईत आणखी वाढ होईल.

हेही वाचा…Video: हनी सिंगने स्टेजवर कचरा साफ करायला आलेल्या मुलाला दिलेल्या वागणुकीने भारावले चाहते, गायक म्हणाला…

‘बेबी जॉन’ हा थलपती विजयच्या ‘थेरी’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात वरुण धवनबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर वामिका गब्बी आणि राजपाल यादव यांच्याही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाची कथा सामाजिक समस्यांवर भाष्य करते. या चित्रपटाचे एकूण बजेट १८० कोटी आहे.

Story img Loader