Bad News Movie screening: विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘बॅड न्यूज'(Bad News) हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शित होण्याच्या एक दिवस अगोदर या चित्रपटाची मुंबईमध्ये स्क्रिनिंग होती. त्यावेळी विकी कौशल आणि कतरिनाने लक्ष वेधून घेतले आहे.

गुरुवारी ‘बॅड न्यूज’ चित्रपटाची स्क्रिनिंग होती. यावेळी विकी आणि कतरिना या जोडीने हजेरी लावली होती. कतरिनाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, तर विकी कौशलने प्रिंटेड शर्ट, काळ्या रंगाचा कोट आणि काळ्या रंगाची पँट असे कपडे परिधान केले होते. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी “हे दोघे एकत्र खूप सुंदर दिसतात”, असे म्हटले आहे. या जोडीबरोबरच बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी हजेरी लावली होती. चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी देखील हजर होती. याबरोबरच अनन्या पांड्ये, एमी विर्क, जॅकी भगनानी, रकुल प्रीत सिंग, नेहा धुपिया, करण जोहर यांनीदेखील हजेरी लावली होती.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो
Alia Bhatt Viral Video
तोंडाला मास्क, साधा लूक…; आलिशान गाडी सोडून आलिया भट्टचा रिक्षाने प्रवास; व्हिडीओ व्हायरल
इन्स्टाग्राम

‘बॅड न्यूज’ चित्रपटातील ‘तौबा तौबा’ गाण्यामुळे विकी कौशल चांगलाच चर्चेत आहे. या गाण्याने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेले आहे. ‘तौबा तौबा’ गाण्यातील त्याच्या डान्सने चाहत्यांपासून ते बॉलीवूडच्या कलाकारांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हृतिक रोशन आणि सलमान खान यांनी विकीचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या, तर सोशल मीडियावर नेटकरी या गाण्यावर रील्स बनवताना दिसत आहेत. याबरोबरच, ‘तौबा तौबा’ गाण्याला मिळालेल्या प्रसिद्धीनंतर त्याने कतरिनाच्या त्याचा डान्स बघितल्यावर काय प्रतिक्रिया होत्या, याचा खुलासा केला होता. त्याने म्हटले होते की, याआधी करतरिनाला मी वरातीत डान्स करणारा वाटायचो. तिने मला अनेकदा सांगितले होते की, तू प्रशिक्षित डान्सर नाहीस. मात्र, ‘तौबा तौबा’ हे गाणे पाहिल्यावर तिने कौतुक करत छान झाले आहे, असे म्हटले होते. तिने कौतुक केल्यावर मला ऑस्कर मिळाल्यासारखे वाटल्याचे विकी कौशलने भावना व्यक्त केल्या होत्या.

Bad News चित्रपटाच्या प्रमोशनवेळी विकीने कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या चर्चांवर केले वक्तव्य

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची जोडी चाहत्यांची लाडकी जोडी आहे. ‘बॅड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कतरिनाच्या गरोदरपणाबद्दलच्या चर्चांवर विकीने उत्तर देताना म्हटले होते की, सध्या तुम्ही ‘बॅड न्यूज’चा आनंद घ्या, जेव्हा तुम्ही म्हणत आहात ती गुड न्यूज येईल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की सांगू.

हेही वाचा: “सरफरोशला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अचानक मला खूप म्हातारं…”, बॉलीवूडमधील वारशाबद्दल अभिनेत्री सोनाली बेंद्रे झाली व्यक्त

दरम्यान, २०१९ ला आनंद तिवारी दिग्दर्शित ‘गुड न्यूज’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये कियारा अडवाणी, करिना कपूर, अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाचा पुढचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. आता ‘तौबा तौबा’ गाण्याप्रमाणेच चित्रपटदेखील प्रेक्षकांना आवडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader