Bad News Team in Delhi Metro: आनंद तिवारी दिग्दर्शित ‘बॅड न्यूज’ चित्रपट काही दिवसांपासून सातत्याने चर्चत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ‘बॅड न्यूज’ (Bad News) चित्रपटातील कलाकारांनी मेट्रोतून फिरण्याचा आनंद घेतला असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
‘Bad News’ चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी, एमी विर्क हे कलाकार अभिनय करताना दिसणार आहे. १९ जुलैला हा चित्रपट रिलीज होणार असल्याने हे कलाकार जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. कधी पराठा हाऊसमध्ये, तर कधी कार्यक्रमांमध्ये हे कलाकार आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. आता या कलाकारांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये हजेरी लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : खूपच बदललीय ‘लगान’मधील निरागस गौरी, २३ वर्षांनंतर आता कशी दिसते अभिनेत्री Gracy Singh? पाहा व्हिडीओ
विकी कौशल, एमी विर्क व तृप्ती डिमरी हे दिल्लीमध्ये गेले होते. तेथे त्यांनी शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत चित्रपटाचे प्रमोशन केले. त्याबरोबरच त्यांनी दिल्लीतील प्रसिद्ध ठिकाणांना भेटी दिल्या. इतकेच नव्हे तर, त्यांनी दिल्ली मेट्रोचाही वापर केला. मेट्रोमध्ये ते एकमेकांशी गप्पा मारत असून, त्यांनी तेथे लावलेल्या नकाशाबाबतदेखील चर्चा केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
विकी कौशलचे प्रेक्षकांना वचन
अभिनेता विकी कौशलने इन्स्टाग्राम वर चाहत्यांबरोबर संवाद साधल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याबरोबरच पराठा आणि हातात लस्सी असलेला फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, तुमच्या प्रेम आणि पराठ्यांमुळे चव आली आहे. धन्यवाद! १९ जुलैला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात भेटू. तुमचे मनोरंजन करण्याची जबाबदारी आमची आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून विकी कौशल सतत चर्चेत आहे. ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील त्याचे ‘तौबा तौबा’ गाणे गाजले असून, चाहत्यांपासून ते बॉलीवूडच्या कलाकारांपर्यंत सर्वांनीच त्याच्या डान्सचे कौतुक केले होते. त्यामध्ये हृतिक रोशन, सलमान खान या कलाकारांचादेखील समावेश होतो. अनेकांनी विकीचे हे गाणे बघितल्यानंतर कतरिना कैफच्या डान्सची आठवण झाल्याचे मत मांडले होते. विकीने ‘तौबा तौबा’ गाणे पाहिल्यावर कतरिनाने जेव्हा मी डान्स नीट केला असून, तिला तो आवडल्याचे म्हटले तेव्हा ऑस्कर मिळाल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याचे त्याने म्हटले होते. त्याबरोबरच कतरिनाला विकी वरातीत नाचणारा मुलगा असून, नृत्याचे त्याने प्रशिक्षण घेतले नसल्याचे वाटायचे. याचादेखील विकी कौशलने खुलासा केला होता. आता ‘बॅड न्यूज’ चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालण्यात यशस्वी ठरणार का, याची उत्सुकता आहे.