Bad Newz Box Office Collection : विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बॅड न्यूज’ चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ‘तौबा तौबा’, ‘जनम’, ‘मेरे मेहबुब मेरे सनम’ या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला. विशेषत: विकी अन् तृप्तीच्या रोमँटिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं. गेल्या आठवड्यात ( १९ जुलै ) प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं ४ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे.

विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बॅड न्यूज’ ( Bad Newz ) चित्रपटाने पहिल्या दिवशी ( शुक्रवारी ) सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ८.३ कोटींची कमाई केली आहे. तर, शनिवारी या चित्रपटाने १०.२५ कोटींचा गल्ला जमावला आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘बॅड न्यूज’ चित्रपटाने शनिवारच्या तुलनेत १ कोटी जास्त कमावत एकूण ११.१५ कोटींची कमाई केली. परंतु, हा मल्टीस्टारर सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitin Gadkari on Omraje Nimbalkar
Maharashtra News Highlights : “ताजमहल लवकर बांधून झाला पण..”, ठाकरेंच्या खासदाराचा संसदेत मराठीत प्रश्न, नितीन गडकरींनी दिले ‘असे’ उत्तर
Loksatta Online organizes Fact Checking workshop Mumbai news
‘फेक न्यूज’ हा साऱ्या विश्वाचाच प्रश्न! लोकसत्ता ‘फॅक्ट चेक’ कार्यशाळेतील तज्ज्ञांचा सूर
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
Pushpa 2 Box Office Collection Day 3
Pushpa 2 : ‘पुष्पा’ने तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी! शाहरुखच्या ‘जवान’ला टाकलं मागे, आतापर्यंतची कमाई किती?
pune pustak Mahotsav latest news
‘लिटफेस्ट’च आता ग्रंथतारक…

‘बॅड न्यूज’ चित्रपटाचं चार दिवसांचं कलेक्शन किती?

‘बॅड न्यूज’ने चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी फक्त ३.५ कोटींची कमाई केली आहे. यामुळे विकी कौशलच्या चित्रपटाचं चार दिवसांचं एकूण कलेक्शन ३३.२ कोटी इतकं झालं आहे.

हेही वाचा : Video : ‘सूसेकी’ गाण्यावर माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा! मराठी ठसका दाखवत जबरदस्त डान्स

विकीच्या आधीच्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं, आदित्य धर दिग्दर्शित ‘उरी’ चित्रपटाने वीकेंडला ३५.७३ कोटी तर, मेघना गुलजारच्या ‘राझी’ने ३२.९४ कोटींचा गल्ला जमावला होता. या तुलनेत ‘बॅड न्यूज’ची ( Bad Newz ) वीकेंडची कमाई केवळ २९.५ कोटी आहे. तर, चौथ्या दिवशीच्या अखेरीस चित्रपटाचं एकूण कलेक्शन ३३.२ कोटींच्या घरात गेलं आहे. आता येत्या काही दिवसांत ‘बॅड न्यूज’ला बॉक्स ऑफिसवर यश मिळतं की, नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अन्यथा, सोमवारची आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट फक्त ४५ कोटींचा गल्ला जमावणार असा अंदाज चित्रपट समीक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : ‘धर्मवीर २’मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार श्रीकांत शिंदेंची भूमिका, पहिल्याच चित्रपटामुळे रातोरात झालेला स्टार

Bad Newz
बॅड न्यूज ( Bad Newz ) चित्रपटाचं कलेक्शन

दरम्यान, विकी कौशल आता लवकरच लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय रणबीर आलियाबरोबर संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा आहेत.

Story img Loader