अभिनेत्री तापसी पन्नूने २३ मार्च रोजी बॉयफ्रेंड मॅथियस बो याच्याशी लग्न केलं आहे, अशी माहिती समोर आली आहे. मॅथियस सध्या भारतात आहे. लग्नाच्या वृत्तानंतर मॅथियसने पहिली पोस्ट शेअर केली आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.
तापसी माजी बॅडमिंटनपटू मॅथियस बोबरोबर दहा वर्षांपासून रिलेशनशिप होती. आता या जोडप्याने लग्न केल्याचं म्हटलं जातंय. त्यांनी राजस्थानमधील उदयपूर इथं लग्नगाठ बांधली आहे, असं वृत्त ‘इंडिया टुडेने’ दिलं आहे. लग्नाच्या चर्चेनंतर मॅथियसने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो रंग खेळल्याचं दिसतंय. त्याच्या चेहऱ्यावर गुलाल लागला असून त्याने ‘हॅप्पी होली’ असं लिहून पुढे तिरंग्याचा इमोजी पोस्ट केली आहे. याशिवाय मॅथियसने तापसी व तिच्या मित्रांबरोबर धुलीवंदन साजरं केलं. तोही एक फोटो समोर आला आहे.
तापसी व मॅथियस यांनी २३ मार्च रोजी उदयपूरमध्ये लग्न केलं असून त्यांच्या लग्नाला जवळचे मित्र आणि कुटुंबीयच हजर होते, अशी माहिती समोर आली आहे. या लग्नाला बॉलीवूडमधील फक्त अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों हजर होते. त्याशिवाय तापसीचा ‘थप्पड’ मधील सह-कलाकार पावेल गुलाटी व अभिलाष थापियाल यांना लग्नाचं निमंत्रण होतं.
दरम्यान, मॅथियसबद्दल बोलायचं झाल्यास तो माजी बॅडमिंटनपटू आहे. तापसी व मॅथियस १० वर्षांपासून नात्यात होते. आता दोघांनी लग्नगाठ बांधली आहे, असं म्हटलं जातंय. पण अद्याप तापसी, मॅथियस किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही लग्नाची अधिकृत माहिती दिलेली नाही.