रॅपर आणि बॉलीवूड गायक बादशाह त्याच्या सुपरहिट गाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. बादशाहची ‘सॅटरडे-सॅटरडे’, ‘डीजेवाले बाबू’, ‘जुग्नू’ अशी अनेक गाणी लोकप्रिय ठरली. अशाचप्रकारे एकेकाळी हनी सिंगनेसुद्धा आपल्या गाण्यांनी लोकांची मन जिंकली होती. हनी सिंगने या इंडस्ट्रीमधून काही काळ विश्रांती घेत पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं. या दोन्ही कलाकारांमध्ये भांडण असल्याच्या चर्चा अनेकदा समोर आल्या आहेत. अशातच आता बादशाहने हनी सिंगची खिल्ली उडवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

सध्या बादशाहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बादशाहच्या एका कॉन्सर्टदरम्यान त्याचं गाणं सुरू असताना हनी सिंगच्या चाहत्यांनी मध्येच हनी सिंगच्या नावाचा जयघोष करायला सुरुवात केली. त्यावर बादशाहने त्यांना प्रत्युत्तर दिलं. बादशाह योयो हनी सिंगच्या चाहत्यांना म्हणाला, “तुम्हीपण इथे आला आहात का? एक पेन आणि पेपर द्या जरा, तुमच्यासाठी मी गिफ्ट घेऊन आलो आहे. काही गाणी लिहून देतो, मग तुमच्या पप्पाचा चांगला कमबॅक होईल. तुमच्याकडे आता हेच काम राहिलंय.”

Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Parrot talking in english fight with women funny video viral on social media
VIDEO: पोपटाची हुशारी पाहिली का? मालकिणीला सर्दी झाल्यानंतर लावतोय लाडीगोडी; अ‍ॅक्टींग पाहून पोट धरुन हसाल
Shocking video
“आ बैल मुझे मार..” बैलाच्या नादाला लागणं काकाला पडलं महागात, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”

बादशाहचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होतोय. हा व्हिडीओ समोर येताच योयो हनी सिंग आणि बादशाहचे चाहते एकमेकांबरोबर भांडू लागले. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये मांडल्या. एकाने कमेंट करत लिहिले, “बादशाहने तर योयो हनी सिंगचा अनादर केला”, तर दुसऱ्याने लिहिले, “पहिले याला स्वत:ला गाणं लिहायला शिकू दे.”

हेही वाचा… ३० वर्षांपूर्वी ‘अशी’ दिसायची हेमांगी कवी, फोटो शेअर करत म्हणाली…

नवभारत टाईम्सच्या माहितीनुसार, बादशाह आणि हनी सिंग आधी ‘माफिया मुंडीर’ या बॅंडमध्ये एकत्र होते, नंतर ते कधीही एकत्र दिसले नाहीत. बादशाहने एका मुलाखतीत सांगितले होते की, हनी सिंगने त्याची फसवणूक केली होती, त्याचा फोन उचलणे बंद केले होते.

हेही वाचा… वरुण धवनची पत्नी नताशा दलाल ‘या’ कारणामुळे होतेय ट्रोल; नेटकरी म्हणाले, “गरोदर असून…”

दरम्यान, बादशाहबद्दल सांगायचं झालं तर नुकतंच बादशाहचं ‘क्लास’ आणि ‘जालिम’ गाणं प्रदर्शित झालं. यात बाहशाहबरोबर ‘नागिन’फेम अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही झळकली होती.

Story img Loader