Diljit Dosanjh AP Dhillon Dispute : गायक दिलजीत दोसांझ, एपी ढिल्लन यांच्या कॉन्सर्टमुळे संपूर्ण देशात नाही तर जगभर त्यांचे चाहते झाले आहेत. दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लन यांनी नुकतेच भारतात कॉन्सर्ट केले. मात्र या दोन गायकांमध्ये आता वाद सुरू झाला आहे. नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टमध्ये एपी ढिल्लनने सांगितले की दिलजीत दोसांझने त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले होते. यावर दिलजीतने असा काही प्रकार घडला नाही, असे उत्तर दिले. परंतु त्यानंतर एपी ढिल्लनने सोशल मीडियावर स्क्रीनशॉट्स शेअर केले होते, ज्यामध्ये दिलजीतने त्याला आधी ब्लॉक केले आणि नंतर अनब्लॉक केल्याचे दिसते. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दोन कलाकारांमधील वाद वाढत असतानाच, रॅपर बादशाहने सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. बादशाहने पोस्टमध्ये लिहिलं, “आम्ही केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करू नका. असं म्हणतात की ‘जर तुम्हाला लवकर पुढे जायचं असेल तर एकटे जा, पण जर तुम्हाला लांबचा पल्ला गाठायचा असेल तर एकत्र जा.”

हेही वाचा…दिलजीत दोसांझने एपी ढिल्लनच्या आरोपांना दिले उत्तर; ब्लॉक प्रकरणावर स्पष्टीकरण देत गायक म्हणाला, “माझे सरकारशी…”

इंदूरमधील आपल्या कॉन्सर्टमध्ये दिलजीतने एपी ढिल्लन आणि करण औजला यांना त्यांच्या कॉन्सर्टसाठी शुभेच्छा दिल्या. त्याने म्हटले, “माझ्या दोन भावांनी टूर सुरू केल्या आहेत – करण औजला आणि एपी ढिल्लन यांना खूप शुभेच्छा.” याला उत्तर देत, चंदीगडमधील आपल्या कॉन्सर्टमध्ये एपी ढिल्लनने दिलजीतला त्याला आधी इन्स्टाग्रामवर अनब्लॉक करण्यास सांगितले. एपीने कॉन्सर्टमध्ये म्हटले, “मला तुम्हाला फक्त एक छोटी गोष्ट सांगायची आहे, भावा. आधी मला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक कर आणि मग बोल. मला कोणत्याही मार्केटिंगबद्दल बोलायचं नाही, पण आधी अनब्लॉक कर. मी गेली तीन वर्षं काम करतोय. तुम्ही मला कधी कोणत्याही वादात अडकताना पाहिलं आहे का?”

दिलजीत दोसांझ एपी ढिल्लन यांच्यातील वाद वाढत असतानाच रॅपर बादशाहने सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.(Photo Credit – Badshah Instagram)

हेही वाचा…Video : पॅकअप होताच मृणाल ठाकूरचा आनंद गगनात मावेना, ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘पीलिंग्स’ गाण्यावर रील करत केली धमाल

यावर दिलजीतने एपी ढिल्लनला इन्स्टाग्रामवर तात्काळ उत्तर दिले. त्याने लिहिले, “मी तुला कधीच ब्लॉक केलं नाही. माझे वाद सरकारांशी असू शकतात… कलाकारांशी नाही.” दिलजीतचा ‘दिल-ल्यूमिनाटी इंडिया टूर’हा दौरा २९ डिसेंबर २०२४ ला संपणार आहे. त्याच्या हा दौरा काहीसा वादग्रस्त ठरला आहे. तेलंगणामध्ये दिलजीतला कॉन्सर्टमध्ये मद्य, ड्रग्स किंवा हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या गाण्यांवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचप्रमाणे, चंदीगडमधील त्याच्या कार्यक्रमासाठी आवाज मर्यादा उल्लंघनाबद्दल आयोजकांना नोटीस मिळाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badshah urges unity and peace between diljit dosanjh and ap dhillon ongoing dispute psg