बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. हजारो भाविक मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाममध्ये पोहोचतात. बागेश्वर धाममध्ये पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार भरतो. धामचे महंत धीरेंद्र शास्त्री यांनी पत्रके बनवून लोकांच्या समस्या सांगण्याचा आणि सोडवण्याचा दावा केला आहे.
हेही वाचा- विकी कौशलने उडवली साराची खिल्ली, अभिनेत्रीची शायरी ऐकून म्हणाला, “मला इथून पुढे…”
नॉस्ट्रम एंटरटेन्मेंट हब ‘द बागेश्वर सरकार’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे, तर विनोद तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट हिंदीबरोबरच इतर अनेक भाषांमध्येही बनणार आहे. दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी चित्रपट बनवण्यामागचा उद्देश सांगितला आहे. बागेश्वर सरकारचा गौरव आणि जगभरातील त्यांच्या अनुयायांचे प्रेम पाहून हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. हा चित्रपट बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात महंत धीरेंद्र शास्त्री यांची भूमिका कोणता कलाकार साकारणार याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.
काय आहे चित्रपटात खास?
या चित्रपटात बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. विनोद तिवारी पुढे म्हणाले की, बागेश्वर महाराज देश-विदेशातील सनातन धर्मातील लोकांना जोडत आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. हे पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एका परोपकारी व्यक्तीचा आदर्श समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात असल्याचेही तिवारी म्हणाले.