शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. तसेच चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळणार असं चित्र दिसत आहे. पण त्याचपूर्वी पुण्यामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘पठाण’ला विरोध दर्शवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : ‘पठाण’साठी सांगली, अमरावतीच्या तरुणांनी बुक केलं संपूर्ण थिएटर, शाहरुख खानही भारावला, म्हणाला, “तुम्हाला…”

नेमकं काय घडलं?

‘पठाण’ चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं. या गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीचा वाद बराच पेटला. दरम्यान ‘पठाण’ प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका बजरंग दलाने मांडली. आत पुन्हा एकदा ‘पठाण’ चित्रपटाविरोधात बजरंग दल आक्रमक झालं आहे.

पाहा व्हिडीओ

पुण्यातील राहुल टॉकीजच्या बाहेर शाहरुखच्या ‘पठाण’चं मोठं पोस्टर लावण्यात आलं होतं. मात्र हे पोस्टर राहुल टॉकीज बाहेर लावलं असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या टॉकीज बाहेरील ‘पठाण’चं पोस्टर काढत ते फाडलं. तसेच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराही दिला.

आणखी वाचा – २४०० रुपयांना विकलं जातंय शाहरुख खानच्या ‘पठाण’चं तिकिट, तरीही शो हाऊसफुल कारण….

‘पठाण’चं पोस्टर काढण्यासाठी राहुल टॉकीजनेही बजरंग दलाला परवानगी दिली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ बजरंग दलाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. एकीकडे ‘पठाण’ पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर दुसरीकडे या चित्रपटाचा वाद पुन्हा डोकं वर काढत आहे. याचा ‘पठाण’च्या कमाईवर कितपत परिणाम होणार हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrang dal protest against shahrukh khan deepika padukone pathaan movie video goes viral on social media see details kmd