बॉलीवूड अभिनेत्री व मंडी येथील नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत यांना गुरुवारी चंदीगढ विमानतळावर एका सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षकाने कानशिलात लगावली. या घटनेबद्दल सोशल मीडियावर काही जण कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरचं कौतुक करत आहेत, तर काहींनी कंगना रणौत यांना पाठिंबा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता कुस्तीपटू बजरंग पुनियाने कुलविंदर कौरला पाठिंबा दिला आहे. त्याने एक्सवर पोस्ट केली आहे, त्यात कुलविंदर कौरने केलेल्या कृतीचं समर्थन केलं आहे आणि तिच्यावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. “जेव्हा महिला शेतकऱ्यांना वाट्टेल ते बोललं जात होते, तेव्हा हे नैतिकता शिकवणारे हे लोक कुठे होते? आता त्या शेतकरी मातेच्या लेकीने गाल लाल केल्यावर ते तिला शांततेचा धडा शिकवायला आले आहेत त्यांनी सरकारी अत्याचारामुळे शेतकरी मारले गेले, तेव्हा सरकारला हा शांततेचा धडा शिकवायला हवा होता,” असं बजरंगने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Video: कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला १ लाख रुपयांचे बक्षीस देणार, व्यावसायिकाने केली घोषणा

एवढंच नाही तर बजरंग पुनियाने शेवटी एक शायरीही पोस्टमध्ये लिहिली. ‘घटाएं उठती हैं बरसात होने लगती है, जब आंख भर के फ़लक को किसान देखता है।’ असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. बजरंग पुनियाने कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही पाठिंबा दिला होता.

“प्रिय फिल्म इंडस्ट्री, तुम्ही सर्वजण…”; विमानतळावरील हल्ल्यानंतर कोणीच पाठिंबा न दिल्याने कंगना रणौत भडकल्या

कंगना रणौत यांना कानशिलात मारल्यानंतर कुलविंदर कौर निलंबित

दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिला प्रत्येकी १०० रुपये घेऊन तिथे बसल्या आहेत, असं कंगना म्हणाल्या होत्या. तसेच कंगना यांनी शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटलं होतं. याच रागातून कुलविंदर कौरने कंगना यांना थोबाडीत लगावल्याचं कळतंय. दरम्यान, चंदीगढ विमानतळावर कंगना राणौत यांना थप्पड मारणाऱ्या कुलविंदरला निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

…म्हणून १२८ मिलियन व्ह्यूज असलेलं ‘बदो बदी’ गाणं युट्यूबने केलं डिलीट, पाकिस्तानी गायकाला कोसळलं रडू, पाहा Photo

बॉलीवूडकरांवर संतापल्या कंगना रणौत

कंगना यांनी पहिली पोस्ट लिहिली आणि डिलीट केली. “प्रिय फिल्म इंडस्ट्री, तुम्ही सर्वजण माझ्यावर विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा आनंद साजरा करत आहात किंवा त्यावर पूर्ण मौन बाळगून आहात. पण लक्षात ठेवा, उद्या तुम्ही आपल्या देशात किंवा जगात कुठेही रस्त्यावर फिरत असाल, तेव्हा काही इस्रायली/पॅलेस्टिनी तुमच्यावर किंवा तुमच्या मुलावर हल्ला करतील, तेही फक्त याचसाठी की तुम्ही सर्वजण राफाहच्या समर्थनार्थ उभे होता होतात, त्यावेळी तुम्ही पाहाल की मी तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढेन,” अशी स्टोरी त्यांनी इन्स्टाग्रामवर टाकली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrang punia supported cisf constable kulwinder kaur for slapping kangana ranaut hrc
Show comments