कबिर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट सुपरहिट झाला होता. २०१५ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता सलमान खानसह अभिनेत्री करीना कपूर, ओम पुरी, नवाजुद्दीन सिद्दीकी असे अनेक कलाकार झळकले होते. विशेष म्हणजे ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील चिमुकल्या मुन्नीने सगळ्यांची मनं जिंकली. हिच चिमुकली मुन्नी म्हणजेच अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा दहावी पास झाली आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: प्रथमेश परब आणि किशोरी शहाणेंचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “अरे व्वा…”

अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी डान्स व्हिडीओ व सुंदर फोटो शेअर करत असते. यावरून तिला सतत ट्रोल केलं जायचं. “बोर्डचे पेपर आहेत, अभ्यास कर. रील बनवून परीक्षेत पास होता येत नाही. कथ्थक क्लासला जातेस आणि रील बनवतेस”, “संपूर्ण दिवस रीलचं बनवतं असतेस का? अभ्यास करतेस की नाही?”, “कथ्थक क्लासला जाशील तर पास कशी होशील?”, “शाळेत जातेस की नाही?”, “दहावीचा अभ्यास कर नाहीतर नापास होशील”, अशा अनेक प्रतिक्रिया देऊन नेटकऱ्यांनी हर्षालीला ट्रोल केलं होतं. याच ट्रोलर्सना हर्षालीने उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – “तथ्य नसलेल्या बातम्यांचा त्याला खूप त्रास व्हायचा”, मनोज बाजपेयींनी सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाले…

हर्षालीने काल एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून अभिनेत्रीने ट्रोलर्सना चांगलंच उत्तर दिलं आहे. हर्षालीने दहावीची परीक्षा सीबीएससी बोर्डातून दिली होती, तिला ८३ टक्के मिळाले आहेत. त्यामुळे तिने हा व्हिडीओ शेअर करून ट्रोलर्सला चपखल उत्तर दिलं आहे. हर्षालीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – Video: “तुम्ही नैसर्गिक सौंदर्याची खरी व्याख्या…”, ऐश्वर्या नारकरांचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस

दरम्यान, अलीकडे हर्षाली मल्होत्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तिने संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ वेब सीरिजमधील ‘एक बार देख लीजिए’ गाण्यावर जबरदस्त एक्सप्रेशन दिले होते. हर्षालीच्या या व्हिडीओतील एक्सप्रेशनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिच्या या व्हिडीओला ८ मिलियन व्ह्यूज असून ३ लाखांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrangi bhaijaan fame harshaali malhotra scored 83 percent in 10th class cbsc board pps