बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. महिना उलटून गेला तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. चित्रपटाने बाहुबली चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. आज जगभरात या चित्रपटाची चर्चा आहे मात्र आपल्या देशाला लागून असलेल्या बांगलादेशामध्ये या चित्रपटाच्या विरोध निदर्शन सुरु आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पठाण’ चित्रपट बेशरम रंग गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान करत रोमान्स केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणीही होत होती. आता हा चित्रपट बांगलादेशात प्रदर्शित होण्याच्या तयारीत असताना तिकडच्या चित्रपटगृहांच्या मालकांनी मोठं पाऊल उचललं आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्ड वाईड रेकॉर्डस्च्या माहितीनुसार बांगलादेश मोशन पिक्चर्स एक्सिबिटर असोसिएशनने अशी चेतावणी दिली आहे की, “जर पठाण चित्रपटाचे प्रदर्शन रोखले गेले नाही तर आम्ही आमचे चित्रपटगृह बंद ठेवू.”

कियारा अडवाणीच्या बॅकलेस फोटोवर पती सिद्धार्थची कमेंट चर्चेत; नेटकरी म्हणाले “नवरा असा…”

असोसिशनचे सेक्रेटरी अवलाद हुसेन म्हणाले की “जरी माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी हिरवा कंदील दिला असला तरी लेखी पुरावा त्यांनी दिलेला नाही. आणि जर चित्रपट प्रदर्शित करण्याची वेळ आली तर आम्ही एका मागोमग एक चित्रपटगृह बंद करू.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

‘पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बांगलादेशमधील अभिनेत्यानेदेखील विरोध केला होता. जगभरात चित्रपटाने १०००कोटींच्या वर व्यवसाय केला आहे. दरम्यान या चित्रपटात शाहरुख सह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banagladesh theatre owner warn if pathan is released in their country they will shut down theatre spg